प्रसिध्द अभिनेता रुग्णालयात दाखल; थोड्याच दिवसात होणार होता चित्रपट रिलीज

दिल्ली | सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी पुर देखील येऊन गेला आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढत असलेलं दिसत आहे. अशात आता पुन्हा एकदा भयावह कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

 

विक्रांत रोना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला साऊथचा अभिनेता किचा सुदीप हा कोरोना विषाणूच्या विळख्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. सध्या डॉक्टरांनी सर्व तपासण्या आणि उपचारानंतर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून त्याला घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कीचा सुदीपच्या विक्रांत रोना या चित्रपटाचे प्रमोशन अजून बाकी आहे.

 

नुकताच कोरोनाची लागण होऊन तो घरी परतला आहे. आता त्याच्यामध्ये कोणतेही कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र डॉक्टरांनी त्याला घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्याचा आगामी चित्रपट तोंडावर येऊन ठेपला आहे. चित्रपटाचे प्रमोशन करणं देखील खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत आता तो त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार का? असा प्रश्न च्याहत्यांना पडला आहे. सर्वजण सोशल मीडिया वरती त्याला वेगवेगळ्या कमेंट करत त्याची काळजी व्यक्त करत आहेत. तसेच तो लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

कीचा सुदीप सध्या त्याच्या आगामी ‘विक्रांत रोना’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सदर चित्रपट 28 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर पाहिले तर सलमान ‘विक्रांत रोना’चे प्रमोशन करत आहे. अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित ‘विक्रांत रोना’ हा एक 3D चित्रपट आहे. यात निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

किचा सुदीप हा साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘फुंक’, ‘फुंक 2’, ‘रान’ सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. तसेच, किच्चा सुदीप सलमानच्या ‘दबंग 3’ मध्ये दिसला होता. ‘मक्खी’ या चित्रपटामध्ये देखील त्याने दमदार अभिनय केला होता. त्याचा अभिनय फार दमदार आहे त्यामुळेच त्याचे चाहते त्याचे सर्वच चित्रपट आवर्जून पाहतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *