Fact Check | ‘प्रेम चोप्रा यांचा दुर्दैवी मृत्यू’ हे आहे खरं कारण

मुंबई | ” प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा” या डायलॉगने सगळ्यांना घाबरवून सोडणारे प्रेम चोप्रा बुधवारी स्वतःचीच एक बातमी वाचून घामाघुम झाले होते. बातमी होती की, प्रेम चोप्रा यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. स्वतः विषयी अशी बातमी वाचून प्रेम चोप्रा खूप संतापले. अशात सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

मात्र नंतर त्यांना राकेश रोशन यांचा फोन आला. त्यांनी या बातमीची शहानिशा करण्यासाठी हा फोन केला होता. अशात ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली. प्रेम यांचा चाहता वर्ग दुःखात शोक व्यक्त करू लागला. तसेच प्रेम यांना सिनेविश्वातील अनेक दिग्गज मंडळींचे फोन येऊ लागले.

ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरू लागली. मग मात्र प्रेम यांनी गप्प बसने बरोबर नाही असे समजले. त्यांनी एका मध्यामाला मुलाखत दिली आणि सांगितले की, ” माझ्या विषयी अशी बातमी पसरवणे खरोखर खूप दुःखद आहे. मी जिवंत आणि सुदृढ आहे. मला काहीच झाले नाही. माझ्या मृत्यूची अफवा पसरवून यांना कोणते सुख मिळत आहे मला माहित नाही. सकाळ पासून मला खूप फोन येऊन गेले. सगळे माझी चौकशी करत होते. हा प्रकार थांबवा.” असे त्यांनी सांगितले.

कलाकारांच्या निधनाची अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील अनेक कलाकारांच्या निधनाची बातमी व्हायरल झाली आहे. अशात यामुळे अनेक कलाकार दुःखी होतात. आपण जिवंत असून आपल्या विषयी असं कुणीतरी म्हणणं हे प्रत्येकासाठी खूप धक्कादायक आहे. प्रेम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट गाजवले आहेत. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांनी जास्तकरून खलनायक म्हणून काम केले. मात्र एखाद्या हिरो पेक्षाही त्यांची प्रसिध्दी जास्त आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *