खळबळजनक ! महिला पोलिस कर्मचारीने पोलीस स्टेशनमध्येच घेतला फा’स; कारण जाणून धक्काच बसेल

ठाणे | पोलीस कर्मचारी नेहमीच आपले कर्तव्य बजावत असताना कुटुंबाचा विचार मागे ठेवत जनतेची सेवा करत असतात. यावेळी खू’न, दरोडे, अपघात, कुजलेले शव या सर्व गोष्टींमध्ये आधी पोलीस दाखल होतात आणि घटनेचा पंचनामा करतात. आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांना या सर्व गोष्टी रोज पाहण्याची सवय नसते. यातील एक जरी घटना आपल्याला समजली तरी देखील आपले काळीज हादरून जाते.

मात्र महिला अथवा पुरुष पोलीस कर्मचारी रोजच अशा घटना सोडवत असतात. यावेळी कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणी काही अडचणी असल्या तर होणारा मानसिक त्रास हा प्रचंड असतो त्यामुळे काही व्यक्ती स्वतः चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. ठाणे श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका महिला पोलिस कर्मचारीने आपले जीवन संपवले आहे.

पोलीस स्टेशनमध्येच या महिलेने आत्महत्या केली आहे. या घटनेने ठाणे श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते घरगुती वादातून कर्मचारी महिलेने हे पाऊल उचलले आहे. अनिता भीमराव व्हावळ असे मृत महिला कर्मचारीचे नाव आहे. त्या २००८ च्या बॅच मधील होत्या. ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या नाईक या पदावर कार्यरत होत्या.

याच ठिकाणी त्यांनी आपल्या ओढणीने घळफास घेऊन आत्महत्या केली. नेहमी प्रमाणे त्या सकाळी १०.३० वाजता कर्तव्यावर रुजू झाल्या. दुपारी दीडच्या सुमारास महिला अंमलदार यांनी अनिता यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बेल वाजूनही त्या कॉल उचलत नव्हत्या त्यामुळे त्यांनी महिला कक्षात जाऊन त्यांना भेटायचे ठरवले तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की, अनिता यांनी स्वतःला ओढणीच्या मदतीने पंख्याला गळफास घेतला होता. १६ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. अनिता यांच्या मागे त्यांच्या दोन मुली आणि पती असा परिवार आहे. त्यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

त्यांच्या आत्महत्याचे पोलिसांनी आकस्मीत निधन म्हणून नोंद केली आहे. प्रथमदर्शनी पोलीस अधिकाऱ्यांनी कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी अजूनही याबाबत तपासून आहे. त्यांच्या आत्महत्येला फक्त कौटुंबिक वाट जबाबदार आहे की आणखीन दुसरे कोणते कारण आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *