राष्ट्रगीत गात असताना माजी सैनिक काळाच्या पडद्याआड

नाशिक | एका सैनिकाची आपल्या देशासाठी असलेली निष्ठा आणि प्रेम फार अफाट असते. देशाच्या सेवेत अनेक सैनिक आपल्या जीवाचे बलिदान देतात. मात्र राष्ट्रगीत गात असताना एका माजी सैनिकाला मृत्यूने कवटाळले आहे. या घटनेने अनेक व्यक्तींना अश्रू अनावर झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सातपूर भागात ही काळीज हेलावणारी घटना घडली आहे. एका कार्यक्रमात माझी सैनिक राष्ट्रगीत गात होते. त्याच वेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचे जागीच निधन झाले. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर शोक सागरात बुडाले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सध्या आझादिका अमृत महोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. नाशकातील संदीप नगर येथील एका खासगी शाळेत देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाला माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

या कार्यक्रमात दाखल झाल्यावर मालुंजकर यांना अस्वस्थ वाटू लागले होते. अशात जेव्हा राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा त्यांना आणखीन अस्वस्थ वाटत होते. मात्र तरी देखील ते राष्ट्रगीतात शामील झाले. यावेळी ते राष्ट्रगीत सुरू झाल्यावर अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.

त्यांना पाहून व्यासपीठावर आलेल्या सर्व मंडळीनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर सगळ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे गेल्यावर मालुंजकर यांना तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे सगळेचजण हळहळ व्यक्त करू लागले. साल १९६२ च्या युद्धात मालुंजकर यांनी सहभाग घेतला होता. तसेच सेवा निवृत्ती नंतर ते भाजपचे संघटक राहिले होते. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *