अल्पवयीन मुलांना नोकरीवर ठेवणे म्हणजे गुन्हा, पण 14 वर्षांचा हा अल्पवयीन मुलगा झोमॅटोमध्ये झाला जॉईन….

दिल्ली | १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्यास बालमजूर अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मुलं १८ वर्षांचे होतं नाही तोवर त्यांची संपूर्ण जबाबदारी पालकांवर असते. मात्र झोमॅटोमध्ये एक अल्पवयीन मुलगा डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसचं या प्रकरणावर झोमॅटोने कौतुकास्पद न्याय निवाडा केला आहे.

दिल्ली येथील रोहिणी नगर येथे
राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी
एक अल्पवयीन मुलगा जेवण घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, हा एक अल्पवयीन मुलगा आहे. मग टोमॅटोने तरी देखील त्याला कामावर कसे काय ठेवले. यावेळी त्या व्यक्तीने अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यावेळी त्या व्यक्तीने मुलाला हे काम का करत आहे असा प्रश्न विचारला.

यावर मुलाने त्याची सर्व परिस्थिती सांगितली. 14 वर्षांच्या या अल्पवयीन डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला अगदी थोड्याच वेळात दोन लाखांहून अधिक व्यूव्ज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये व्हायरल होत असलेला हा मुलगा दिल्लीतील समयपुर बदली येथे राहतो. हा मुलगा अठरा वर्षांचा आहे. त्याच्या घरी त्याचे आई-वडील आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. घरामध्ये करता पुरुष म्हणजे त्याचे वडील हे एका कारखान्यावर नोकरी करतात. नोकरी बरोबरते झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे देखील काम करत होते. कारखान्यातील सहा तासांची शिफ्ट संपवल्यानंतर ते घरी आल्यावर सायकलवरून डिलिव्हरी बॉयचे काम करायचे. या मुलाची आई देखील घरकाम करते. घरकाम करून ती आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करत आहे.

सहा तास काम केल्यानंतर त्याच्या वडिलांना दररोजचे दोनशे रुपये मिळतात. एवढ्याशा पैशांमध्ये घर चालत नसल्याने त्याच्या आईने देखील बाहेर घर काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच वडील देखील झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करू लागले. मात्र एका अपघातात त्याच्या वडिलांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करणे शक्य नाही. त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने कारखान्यात सहा तास काम केल्यानंतर त्यांना पुन्हा डिलिव्हरी बॉयचे काम करताना त्रास होतो. त्यामुळे त्यांनी हे काम बंद केले.

मात्र त्यांच्या मुलाला घरची परिस्थिती बघवत नव्हती. त्यामुळे त्याने वडिलांच्या जागी स्वतः डिलिव्हरी बॉयचे काम करण्याचा निर्णय घेतला. दुपारी तीन वाजेपर्यंत शाळेतील तास पूर्ण झाल्यानंतर तो सहा वाजेपर्यंत घरी येऊन अभ्यास करायचा. त्यानंतर सहाच्या पुढे रात्री सायकलीवर झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. आपल्या वडिलांना थोडा हातभार लागावा म्हणून तो मुलगा हे काम करत होता. सर्व काही ठीक सुरू होते मात्र रोहिणी नगर येथील एका व्यक्तीला हा मुलगा अल्पवयीन असल्याचे समजले त्यामुळे हे सर्व वास्तव समोर आले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही त्याला काम करण्यास खूप वेळा मनाई केली मात्र तो आमचे काहीच ऐकत नाही. तसेच त्या मुलाच्या आईने देखील सांगितले की, माझा मुलगा लहानपणापासूनच खूप मेहनती आहे. मी त्याला सांगितले होते की मी जास्तीचे घर काम करेल तू बाहेर कामाला जाऊ नको. मात्र त्याला घरची परिस्थिती बघत नसल्याने त्याने कामाला जाण्याचा हट्ट केला. अल्पवयीन मुलगा काम करत आहे यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे आई-वडील देखील आता घाबरले होते.

मात्र झोमॅटो कंपनीने या सर्वांवरती सुखद मध्य काढला आहे. मुलाच्या घरची परिस्थिती आणि कामासाठी असलेली त्याची मेहनत लक्षात घेता झोमॅटोने या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. तसेच एक नोट जरी करत झोमॅटोने म्हटलं आहे की, सोशल मीडिया मार्फत हा संपूर्ण प्रकार आमच्या उघडकीस आला. त्यामुळे सोशल मीडियाचे धन्यवाद. बालकामगार ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळेच आम्ही शक्य तेवढी मदत या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी करत आहोत. मुलाने आणि त्याच्या घरच्यांनी दिलेले स्पष्टीकरण ऐकता आम्ही त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *