आठ महिन्यांची गरोदर महिला चिरडली ट्रकच्या चाकात, पोट फुटून जिवंत बाळ पडलं रस्त्यावर…..

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील आग्रा येथे थरकाप उडवणारी एक भयावह घटना घडली आहे. ही घटना वाचून तुमच्या ही अंगावर सरकन काटा येऊ शकतो. एका महिलेने मरता मरता आपल्या बाळाला जन्म दिला आहे. मात्र हा जन्म खूप भयानक पद्धतीने झाला आहे. सदर महिला रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून भरदा वेगात ट्रक गेला. यामध्ये ती पूर्णतः चिरडली गेली आणि तिचे पोट फुटून बाळ बाहेर पडले. सदर घटनाने रस्त्यावरील अनेक व्यक्ती भयभीत झाल्या. कारण पहिल्यांदाच एका बाळाचा अशा पद्धतीने जन्म झाला आहे.

कामिनी आणि रामू हे विवाहित जोडपे दोन महिन्यांनंतर आई बाबा होणार होते. कामिनीला आठवा महिना सुरू होता. त्यामुळे आपल्या पत्नीला बाळंतपणासाठी रामू तिला माहेरी घेऊन चालला होता. यावेळी हे दोघेही एका दुचाकीवरून चालले होते. दुचाकी चालवत असताना अचानक रामूचा समतोल बिघडला. त्यामुळे त्याची गाडी फरफटत खाली पडली. यावेळी रस्त्यावर कामिनी थोडी दूर अंतरावर फेकली गेली. तितक्यात समोरून भरधाव वेगात एक ट्रक आला. त्या ट्रकच्या चाकात कामिनी पूर्णता चिरडली गेली. त्यामुळे तिचा गर्भाशय फुटून बाळ बाहेर फेकले गेले.

सदर घटना रामूच्या डोळ्यासमोर घडली. हा थरकात पाहून तो देखील खूप घाबरला. रस्त्यावर असलेल्या सर्व व्यक्तींना देखील याची भीती वाटली. एकीकडे बाळ जन्माला आले होते तर दुसरीकडे पत्नी मृत्यूच्या दारात होती. कामिनीचा जीव तिथेच रस्त्यावर गेला होता. मात्र पतीच्या प्रेमापोटी रामूने तिला आणि बाळाला रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने रुग्णालयात नेले. कामिनी आता या जगात नाही. मात्र तिचे बाळ सुखरूप आणि सुदृढ आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *