चित्रपट सृष्टीत येऊन कमविला बक्कळ पैसा; मात्र शेवटच्या दिवसात भोगाव्या लागल्या नरक यातना

मुंबई | अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप काळ अभिनय क्षेत्रात काम केले मात्र त्यांनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या चीरकाळ लक्षात राहिली आहेत. या कलाकारांनी खूप कमी कालावधीत प्रसिध्दी मिळवली मात्र त्यांच्या आयुष्यात हे यश आणि समृध्दी फार काळ टिकली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये त्या कलाकारांचा भयानक पद्धतीने मृत्यू झाला.

आज या बातमीमधून अशाच एका कलाकाराची कहाणी जाणून घेणार आहोत. ए के हंगल यांनी बॉलीवूडमध्ये आपले नाव अजरामर केले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला साल १९६६ पासून सुरुवात केली. खूप कमी काळात त्यांनी बॉलीवूड काबीज करण्यात यश मिळवले. त्यामुळे प्रचंड पैसा आणि सुख त्यांच्या पायी लोटांगण घालत होते.

भारतच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील ए के हंगल यांनी कामगिरी बजावली आहे. यात त्यांचा देखील खारीचा वाटा राहिला आहे. त्यांनी साल १९२९ ते १९४७ पर्यंत स्वतंत्र लढ्यात सहभाग नोंदवला आहे. यात त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला आहे. १९४७ ते १९४९ ही दोन वर्षे ते कराचीच्या कोठडीत होते. इथून बाहेर आल्यावर त्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमवन्याचा निर्णय घेतला.

साल १९६६ मध्ये मुंबईला आल्यावर त्यांनी तिसरी कसम आणि शागीर्द अशा चित्रपटांमध्ये काम केले. तिसरी कसम हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वडिलांची भूमिका साकारली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हंगल यांनी खूप कमी काळात याशाला गवसणी घातली होती. त्यामुळे त्यांची प्रसिध्दी आजही कायम आहे. अनेक व्यक्ती त्यांचे चित्रपट आजही आवडीने पाहतात.

खूप पैसा कमावून देखील हंगल यांचे शेवटचे दिवस खूप बिकट गेले. शेवटी पैसा संपत्ती सर्व काही संपवून बसल्यावर त्यांना अनेक आजार जडले होते. त्यावेळी उपचारांसाठी त्यांना बिग बींनी २० लाख रुपये मदत म्हणून दिले होते. तर करण जोहरने देखील त्यांना काही रक्कम दिली होती. त्यांच्या मुलाने या विषयी एका मुलाखतीत सांगितले होते. हंगल यांची प्रकृती अधिक ढासळत गेल्याने २६ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यावेळी सर्वच चाहता वर्ग हळहळ व्यक्त करत होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *