महेश भट्ट यांच्यामुळे ही अभिनेत्री पोहचली मरणाच्या दारात

मुंबई | बॉलीवूड मधील भट घराननं हे नेहमीच वादाच्या विळख्यात सापडलेलं आहे. महेश भट आणि त्यांची मुलगी पूजा भट या दोघांनी एका मॅक्झिनसाठी लीप टू लीप किस सीन दिले होते. यावेळी हा वाद खूप चिघळला होता. अनेकांनी महेश यांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

 

यावर एका मुलाखतीत ” पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते….” असे देखील महेश भट म्हटले होते. अशात त्यांनी आपल्या मुलीला म्हणजे पूजाला एका मोठ्या व्यसनातून बाहेर काढले आहे. पूजा ही नव्वदच्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री होती. तिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले.

 

 

डॅडी हा तिचा पहिला वहिला चित्रपट होता. या एकाच चित्रपटातून ती खूप प्रसिद्ध झाली होती. यावेळी दिग्दर्शक महेश भट यांनी आपल्या मुलीला पहिल्याच चित्रपटातून अतिशय मादक आणि बोल्ड अंदाज सगळ्यांसमोर आणल होतं. यावेळी पूजा फक्त १६ वर्षांची होती. या चित्रपटानंतर देखील तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

 

याच दरम्यान तिला दारूचे मोठे व्यसन जडले. कारण तिच्यावर आणि तिच्या वडिलांच्या नात्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या दोघांमध्ये तसे काहीच नव्हते. याच काळात तिने प्रेम दिवाने, जनम, दिल है के मानता नही, जुनून, फिर तेरी कहानी याद आयेगी, चोर और चांद, पहिला नशा, तडीपार अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.

 

 

यावेळी ती एका युवकाच्या प्रेमात पडली. मात्र काही दिवसांनी त्याचे निधन झाले. त्यामुळे ती खूप खचून गेली. यातच तिने दारूची जास्त नशा करायला सुरुवात केली. या नशेत तिने स्वतः चे खूप नुकसान करून घेतले. ती दिवस रात्र दारू पीत राहिली. शिवाय वडिलांबरोबर अनेक टीका तिच्यावर आजही होतात. त्यामुळे ती या गोष्टीने देखील चिंतेत होती.

 

यात तिला अनेक आजार जडले. तिचे शरीर हळू हळू निकामी होऊ लागले. आज मरते का उद्या अशी तिची परिस्थिती झाली. मात्र यावेळी महेश भट यांनी तिला खूप समजावले. तसेच या सर्व दुःखातून तिला बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तसेच साल १०१६ मध्ये तिने दारू सोडली. तेव्हा पासून तिने आजवर दारूच्या थेंबाला देखील हात लावलेला नाही. आता ती निरोगी आयुष्य जगत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *