तुम्हाला चित्रपट पहायची आवड असेल तर हे चित्रपट नक्की पाहा

मुंबई | जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला हे माहितच असेल की, चित्रपट हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे डोक्याला जराही तान न देता फक्त ॲक्शन, ड्रामा आणि मनोरंजन असलेले चित्रपट आणि दुसरं म्हणजे बंद झालेल्या डोक्याला देखील विचार करायला भाग पाडणारे चित्रपट.

जिथे डोक्याचा पूर्ण वापर केल्यावरच चित्रपट समजतो. आज या व्हिडिओमधून असेच काही चित्रपट जाणून घेणार आहोत ज्यांची नावं तुम्ही कदाचित ऐकिली नसतील पण गॅरंटीसह सांगते की, हे चित्रपट पाहून मनोरंजनासह तुमच्या बुध्दीला चालना आणि ताण देखील मिळेल.

• फोबिया : फोबिया हा एक असा चित्रपट आहे जो खरोखरंच तुम्हाला अस्वस्थ करू शकतो. यामध्ये एक मुलगी असते. जिचं मानसिक आरोग्य बरोबर नसतं. त्यामुळे ती सतत आपल्या घरी एकटीच राहते. तिचं असं म्हणणं असतं की, बाहेरच्या जगामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती तिचा जीव घेणार आहे.

आता खरं पहिलं तर बाहेरील जगापेक्षा तिची ही लढाई स्वतः बरोबरचीच आहे. त्यामुळे यामध्ये ती स्वतःचा जीव गमावेल का? की खरोखरच कुणी तरी तिचा जीव घेईल? काय खरं काय खोटं असे अनेक प्रश्न चित्रपट पाहताना मनामध्ये येतात. हा चित्रपट सुपर थ्रिलर चित्रपट आहे.

3 स्टोरीज : साल २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला 3 स्टोरीज हा चित्रपट देखील तुमच्या मेंदूला ताण देणारा आहे. जरा विचार करा तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयाचा परिणाम तुम्हाला माहीत नसलेल्या आगदी अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यावर होत आहे. चित्रपटात देखील हेच दाखवलं गेलं आहे.

इथे एक कपल असतं जे त्यांची जात वेगवेगळी असल्याने लग्न करू शकत नाहीत, तर दुसरीकडे एक महिला आहे जी, तिच्या पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळली आहे आणि तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण येतं आहे. तिसरी कहाणी आहे एका आजींची ज्यांना त्यांचं घर विकायचं आहे.

मात्र घराची किंमत ऐकून लोक दरवाजातूनच परत जात आहेत. तसेच एक मध्यम वयाची स्त्री आहे. जी पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करत असते. हे सर्व जण आणि त्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत मात्र त्यांची प्रत्येक गोष्ट एकमेकांना जोडलेली आहे. चित्रपट पाहताना कदाचित त्या जागी तुम्ही आहात असं देखील तुम्हाला वाटू शकतं.

तलाश : तलाश हा एक वस्तावावर आधारित चित्रपट आहे. इथे आपल्या खऱ्या आयुष्याचा भूताशी असलेला संबंध दाखवला आहे. एक कार रस्त्याने जात असते. रस्ता सामसूम असल्याने ती भटकते. त्या प्रवाशांना चकवा लागलेला असतो. त्यानंतर काही वेळाने त्यातील सर्व लोक पाण्यात बुडतात.

त्यातले आर्धे कसाबसा स्वतःचा जीव वाचवतात आणि बाहेर येतात. पण यात बऱ्याच व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यानंर या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एक पोलिस अधिकारी येतो. लहानपणीच त्याचा एक मुलगा वारलेला असतो. त्यामुळे तो थोडा मानसिक तणावात असतो. जर तुम्हाला खरंच भूत आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींवर विश्वास असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे.

टेबल नंबर २४ : टेबल नंबर २४ या चित्रपटामध्ये एक कपल असतं ज्यांच्या आयुष्यात खूप आर्थिक अडचणी असतात. अशात अचानक त्यांना एक अशी लॉटरी लागते की, त्यांना रातोरात त्यांचं भविष्य बदलते. त्यांना करोडपती होण्याची संधी मिळते. मात्र त्याआधी त्यांना एक खेळ खेळायचा असतो. ज्यामध्ये खरं बोललं की, पैसे मिळतात आणि खोटं बोलल्यावर आत्महत्या करावी लागते असे असते. हा चित्रपट इतका भयानक आहे की, कदाचित फ्रीमध्ये मिळणाऱ्या गोष्टी घेताना तुम्ही १०० वेळा विचार नक्की कराल.

• नो स्मोकिंग : २००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक सुपर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात एका व्यक्तीला सिगरेटचं भयंकर व्यसन असतं, आणि एक सिगरेटचं त्याच्या आयुष्यात त्याची आयुष्यभरासाठी साथ देते. चित्रपटातील व्यसनमुक्ती केंद्र दाखवण्यात आला आहे. पण इथलं व्यसन मुक्ती केंद्र थोड विचित्र आहे. कारण इथे व्यसन सोडवण्यासाठी त्या व्यक्तीचे अवयव त्याला गमवावे लागतात. हा चित्रपट पाहताना तुम्हाला स्वतः विषयी नक्कीच खूप प्रेम वाटेल.

मनोरमा : बॉलिवूडमधील थ्रिलर आणि हायपरलिंक चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करणारा हा चित्रपट साल २००७ मध्ये प्रदर्शित झाला. इथे एक माणूस असतो जो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो. मात्र एक दिवस तो आपल्या आयुष्यात खूप मोठी चूक करतो आणि तो अपयशी ठरतो. चित्रपटाचं नाव मनोरमा हे त्या माणसाने त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा संग्रह केलेल्या पुस्तकाचं नाव आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *