बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या घराण्यातील या तीन भावंडाना ओळखलंत का?

मुंबई | सोशल मीडियावर सध्या दिग्गज कललाकरांच्या बालपणीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. अनेक जण या कलाकारांना ओळखण्याचे चॅलेंज स्वीकारत आहेत. तर बातमीत दिसत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन लहान मुलं आहेत. यातील मुलगी मध्यभागी बसली आहे तर तिच्या दोन्ही बाजूला दोन क्यूट मुलं आहेत.

यातील एक मुलगा तिच्याकडे पाहत आहे. तर दुसरा मुलगा हा टेलीफोन कानाला लावलेला दिसत आहे. हे तिघेही फोटोमध्ये खूप गोड दिसत आहेत. ही तिन्ही मुलं बॉलिवुडच्या एका दिग्गज अभिनेत्याची आहेत. यातील दोन मुलांनी अभिनय क्षेत्रात नुसता धुराळा उडवला होता.

तसेच यांचे कुटुंब हे बॉलिवूडच्या दिग्गज कुटुंबा पैकी एक आहे. हो तुम्ही बरोबर ओळखत आहात हे तिघेही कपूर कुटुंबातील महत्वाचे शिलेदार आहेत. हे तिघेही राज कपूर यांची मुलं आहेत. मोठी मुलगी रितू नांदा आणि रणधीर कपूर, ऋषी कपूर. यातील दोन्ही भावांनी बॉलीवूड खूप गाजवले.

रितू नंदा एक व्यावसायिक आणि विमा सल्लागार होत्या. निखिल नंदा आणि नताशा नंदा अशी त्यांच्या दोन मुलांची नावे आहेत. तर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन ही त्यांची सून आहे. त्यांचा नातू अगस्त्य नंदा द आर्चीजमधून लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांची नात नताशा नंदाला अभिनयाची आवड नाही तिला व्यवसायात रस आहे.

रितू यांनी 14 जानेवारी 2020 रोजी जगाचा निरोप घेतला. रणधीर कपूर यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1947 रोजी झाला. त्यांनी 1971 मध्ये बबिता यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांना करिष्मा कपूर आणि करीना कपूर अशा दोन मुली आहेत. या दोघी देखील बॉलीवूड गाजवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

त्यांचे भाऊ अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील बॉलीवूडवर राज्य केले. 4 सप्टेंबर 1952 रोजी त्यांचा जन्म झाला. 1980 मध्ये त्यांनी नीतू सिंग यांच्याशी लग्न केले. या दोघांना रणबीर कपूर, रिधिमा कपूर आणि सहानी कपूर अशी तीन मुले आहेत. आपल्या अभिनयाने ऋषी यांनी अनेकांच्या मनात राज्य केले. मात्र 30 एप्रिल 2020 साली त्यांचे निधन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *