‘पांडुरंग आणि Google Maps’ हे कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का? या मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुंबई | कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे पंढरपूरची वारी काही झालीच नाही. त्यामुळे सर्वच भाविक यंदा वारीला हजर राहिले होते. वारीला जाण्याची पांढुरंगला भेटण्याची ओढ यामुळे अधिक वाढली होती. अशात अनेक कलाकार देखील यंदा वारीला आले होते. नुकतीच आषाढी एकादशी पार पडली. यावेळी अनेक कलाकार सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत या वारीच्या शुभेच्छा देत होते. अशात गूगल मॅपच नात पांढुरंगाची जोडलेलं आहे. असं एका अभिनेत्याने म्हटल.

ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारा अभिनेता वरुण भागवत याने ही पोस्ट शेअर केली होती. त्याने यामध्ये गुगल मॅपच कनेक्शन सांगत एक पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. अजूनही त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

त्याने यामध्ये लिहिलं होतं की, ” पांडुरंग आणि Google maps.” असं शीर्षक देत त्याने लिहिलं की, ” कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही फायनल डेस्टिनेशन सांगतात.”

” गुगल मॅप आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय. गुगल मॅप रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत स्टोप्स लागतील. त्या स्टोप्स चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल.

हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या ट्रॅफिक जॅममधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. चॉईस आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं.”

“रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का. कधी चढ तर कधी उतार. कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता. कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता. कधी फस्ट गेर तर कधी मस्त फिफ्थ गेर वर जाता येईल. कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ. ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्गअवलंबावा लागतो.”

“या जगात आपण सारेच मुसाफिर. भटकत असतो. रस्ता असतो. चालत राहतो. हवेसंग डोलत असतो. प्रवास आहे. आनंद घेत असतो. आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना? कारण नीट विचार केला की कळतं की इथे डेस्टिनेशन महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत.” असं त्याने लिहिलं आहे.

पुढे माऊलींचा एक श्लोक सांगत तो लिहितो की, “कारण माउलींनी म्हटलंच आहे, अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥ जाईन गे माये तया पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया ॥” त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आहे. याने गूगल मॅप बरोबर केलेली विठ्ठलाची तुलना सर्वांना पटली आहे. अशात यंदाच्या वारीला तो ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपात वारीला सहभागी झाला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *