तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर बाबत माहितीये का हे…

मुंबई | अक्षया देवधर हिचे प्रेमप्रकरण सुयश टिळकसोबत सुरू असल्याची चर्चा त्यावेळी होती. शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत तो दिसला होता. तसेच का रे दुरावा या मालिकेतील दिसला होता. या दोघांचे प्रेम प्रकरण चांगलेच बहरले असताना आता या दोघांमध्ये ब्रेक-अप झाल्याची चर्चा रंगत आहे. 2018 मध्ये दोघांनी फोटोसेशन करून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

काय म्हणतोय सुयश टिळक:
त्यानंतर या दोघांनी साखरपुडा केलेली चर्चा देखील रंगली होती. मात्र, आता सुयश टिळकने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकलेली होती. त्यामुळे या दोघांचे ब्रेक-अप झाले की काय अशी चर्चा आता रंगत होती. सुयश टिळक आणि अक्षया देवधर यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून प्रेमप्रकरण होते.सुयश टिळक आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतो की, एखाद्यावर प्रेम केलं तर त्याला कठीण प्रसंगांमध्ये साथ द्यावे लागते.

 

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरचा साखरपुडा:

तेवढा विश्वास दोघांमध्ये असावा लागतो, अशी त्यांनी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे त्याचे आणि तिचे ब्रेक-अप झाले होते. आता तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम करणारा हार्दिक जोशी म्हणजे राणादा आणि अक्षया देवधर यांनी काही दिवसापूर्वी आपला साखरपुडा उरकला आहे. या दोघांची जोडी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे दोघांचं जुळल सुत:
कारण या मालिकेमध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले होते. काही दिवसांपूर्वी या दोघांचे सूत जुळले आणि या दोघांनीही साखरपुडा उरकून घेतला. आता हे दोघे लग्न कधी करतात हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे. लग्नाच्या आधीच अक्षया देवधर हिने एक गुड न्यूज दिली आहे. आपल्याला वाटले असेल ती गरोदर आहे की काय.

 

मात्र, असे काही नसून अक्षया देवधर हीने तिच्या जोश या अकाउंटवर लाखो फॉलोवर मिळवले आहेत. म्हणजे तिला एक लाख फॉलवर मिळाले आहे. त्याचबरोबर तिने या आधी इंस्टाग्राम अकाउंट वर देखील लाखो फॉलॉवर्स मिळवले होते.

 

अक्षया आता लग्नात जी साडी नेसणार आहे ती साडी हार्दिक विणतोय:

अक्षया आणि हार्दिक यांच्या जवळची मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या सगळ्यांनी मिळून अक्षया जी साडी लग्नावेळी नेसणार आहे ती विणण्याचा शुभारंभ पुण्यात केला आहे.साडी विणण्याचा हा विधी प्री-वेडिंगमधील भाग झाला आहे. याआधीही काही कलाकार दाम्पत्यांनी त्यांच्या लग्नाच्या आधी हा विधी केला होता.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *