दिपू आणि अप्पू ऑन स्क्रिन आल्या एकत्र, पण कशासाठी….

मुंबई | अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आजवर आपल्या दमदार अभिनयाने लाखोंचा चाहता वर्ग गोळा केला आहे. सुरुवातीला तिने जेव्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते तेव्हा ती दुर्वा या मालिकेत दिसली होती. या मालिकेत देखील तिचा अभिनय उत्तम होता. मात्र तिला खरी प्रसिध्दी मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. या मालिकेमुळे तिने अनेक तरुणाईची मने जिंकली.

आता मन उडू उडू झालं या मालिकेतून ती सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. तसचं ही अभिनेत्री आता छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर उडी घेत आहे. तिच्या अभिनयाची झेप पाहता सर्वजण तिचे मोठे कौतुक करत आहेत. तिच्या पदरी सध्या दोन मोठे सिनेमे आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनसाठी तिने जोरदार कंबर कसली आहे.

सोशल मीडिया, रेडिओ तसेच इतर अनेक माध्यमांमधून ती तिच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करत आहे. अनन्या आणि टाइमपास ३ असे दोन मोठे चित्रपट तिने साकारले आहेत. या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. दोन्ही चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी या अभिनेत्रींनी देखील आपल्या अभिनयाची सुरुवात मालिकेपासून केली आणि त्यानंतर मोठा पडदा त्यांनी चांगलाच गाजवला. अशात नुकतेच या तिन्ही अभिनेत्रींचे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यावेळी तिघींनी जोरदार सोशल मीडियाचा वापर करत प्रमोशन केले. अशाच हृताने मात्र यासाठी आणखीन एक पाऊल पुढे टाकल आहे. आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी तिने सोशल मीडिया बरोबरच आता मालिकांची देखील निवड केली आहे.

स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये ती तिच्या आगामी अनन्या या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. रविवारी प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये हृता प्रमोशनसाठी आली होती. यावेळी अप्पू आणि तिने एकत्र स्क्रीन शेअर केली. या दोघी एकत्र येणार आहेत हे समजताच हा एपिसोड पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अशात हृताचा बहुप्रतीक्षित चित्रपट अनन्या हा 22 जुलै रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला पाहता येईल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *