महिमा चौधरीच्या मुलीला पाहिलंत का? दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलीवूड मधील महिमा चौधरी या अभिनेत्रीने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पहिल्याच चित्रपटातून ही अभिनेत्री प्रचंड गाजली होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाप्रमाणेच ही अभिनेत्री दिसायला देखील अपार सुंदर आहे.

तिच्या सुंदरतेचे अनेक जण आजही दिवाने आहेत. नव्वदच्या दशकातील कलाकारांची मुले आता नेमकी कशी आहेत याविषयी सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. महिमा चौधरी या अभिनेत्रीची मुलगी देखील दिसायला अगदी हुबेहूब तिच्यासारखीच आहे. आज या बातमीतून तिच्या मुली विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

महिमा चौधरी या अभिनेत्रीचा जन्म दार्जिलिंग येथे 13 सप्टेंबर 1973 रोजी झाला. वयाच्या 24 व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्या चित्रपटांमध्ये ती किंग खान बरोबर रुपेरी पडद्यावर झळकली. तिचा पहिला चित्रपट परदेस हा होता. या चित्रपटाला समीक्षकांची चांगलीच शाबासकी मिळाली.

चित्रपटातील कथा त्याचबरोबर महिमाचा अभिनय याचे सर्वांनीच कौतुक केले. या चित्रपटामुळे महिमाच्या प्रसिद्धीत एका रात्रीत भली मोठी वाढ झाली. यानंतर तिच्या पुढे अनेक प्रोजेक्ट येऊन पडले. सुभाष घाईने या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सांभाळले होते. महिमाचा अभिनय पाहता तिला पहिल्याच चित्रपटासाठी बेस्ट फीमेल डेब्यू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

साल 2006 मध्ये महिमाने बॉबी मुखर्जी बरोबर विवाह केला. सुरुवातीला काही दिवस चांगले गेल्यानंतर या दोघांना एक मुलगी देखील झाली. अर्याना चौधरी असे महिमाच्या मुलीचे नाव आहे. सात वर्ष संसार केल्यानंतर महिमाने बॉबी मुखर्जी पासून वेगळी झाली. काही दिवसांनी या दोघांमधील मतभेद वाढू लागले.

त्यामुळे दोघांनी एकत्र येत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अर्याना खूप लहान होती. मात्र आता ती बरीच मोठी झाली आहे. सोशल मीडिया वरती प्रचंड सक्रिय असते. तसेच आपल्या आईबरोबर वेगवेगळे फोटो शेअर करत असते. महिमा देखील आपल्या मुलीबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.

महिमा देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या मुली बरोबर घालवलेले कॉलिटी टाईम ती सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलीबरोबरचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये अर्याना खूपच सुंदर दिसत आहे. तिने एक लाल रंगाचे टी-शर्ट घातले असून नो मेकअप लूकमध्ये मस्त स्माईल देत आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

अनेक युजर तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “खूपच सुंदर दिसते अगदी आईची कार्बन कॉपी….” तर दुसऱ्या एका युजरने म्हटल आहे की, ” महिमाची मासूम मुलगी.” आणखी एकाने कमेंट करत लिहिले आहे की, ” खूप गोड दिसते….” या सर्व कमेंटसह तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजीचा देखील वर्षाव करण्यात आला आहे.

महिमा चौधरीचा घटस्फोट झाल्यानंतर तिने आपल्या मुलीला एकटीने सांभाळले आहे. त्यामुळे तिच्या मुलीला आई विषयी जास्त आदर आहे. खरंतर महिमा आणि बॉबी या दोघांचा घटस्फोट झालेला नाही मात्र कोर्टाकडून मुलीची जबाबदारी महिला देण्यात आली होती.

महिमा चौधरीच्या बहिणीचा मुलगा रयान आणि अर्याना हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडते. महिमा तिच्या बहिणीच्या घरी सतत जात असते. त्यामुळे या दोन बहिण भावांमध्ये मैत्रीचे देखील नाते तयार झाले आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *