आनंद इंगळे यांच्या खऱ्या पत्नीला पाहिलत का?

मुंबई | फू बाई फू या विनोदी कार्यक्रमाने अनेक होतकरू कलाकारांना उदयास आणले. त्यातीलच एक आनंद इंगळे. आनंद यांनी आजवर अनेक मालिका आणि नाटकांत काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचा डंका आज महाराष्ट्रभर पसरला आहे.

आनंद इंगळे यांच्या पत्नीचे नाव राधिका आहे. त्या स्मार्ट मीडिया स्कूलच्या डायरेक्टर आहेत. तसेच त्यांचा मुलगा मलेशियामध्ये फायनान्स या विषयाचे शिक्षण घेत आहे. आनंद इंगळे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते नेहमी आपल्या कुटुबियांसमवेत घालवलेले क्षण चाहत्यांबरोबर शेअर करतात.

आनंद इंगळे यांनी “फू बाई फू” नंतर “शेजारी शेजारी पक्के शेजारी” आणि “हम्मा लाईव्ह” या मालिकांमध्ये काम केले. तसचं आता पर्यंत त्यांनी अफेअर डील, तुझ्यात माझ्यात, दोन स्पेशल, लग्नबंबाळ, वस्त्रहरण, वाऱ्यावरची वरात, व्यक्ती आणि वल्ली, सूर्याची पिल्ले ही नाटके गाजवली आहेत. यासह त्यांनी अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०), गोळाबेरीज (२०१२), पोश्टर गर्ल (२०१६), बालक पालक (२०१२) या चित्रपटांत काम केले आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *