पुण्यात धोनीनं घेतलं आलिशान घर; किंमत पाहून धक्काच बसेल

पुणे | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज विकेटकीपर एमएस धोनी आणखी एका घराचा मालक बनला आहे. त्याने नुकतेच पुण्यामध्ये घर खरेदी केले. हे घर पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. धोनीने पुण्याआधी मुंबईतही घर खरेदी केले होते. काही दिवसांपूर्वी पत्नी साक्षीने मुंबईच्या नव्या घराचे फोटो शेअर केले होते.

पुण्यात घर घेतल्यानंतर काही वेळा मॉर्निंग वॉकसाठी तो बाहेर पडताना अनेकांनी त्याला बघितले आहे. यामुळे आता महेंद्रसिंग धोनी पुण्यातच स्थायिक होणार का अशी चर्चा देखील सुरू आहे. यामुळे त्याचे पुण्यातील चाहते खुश आहेत.

धोनी आणि पुणे सहरच खास कनेक्शन – धोनी आणि पुणे शहर यांच्यात खास कनेक्शनही आहे. आयपीएलमध्ये त्याने पुणे सुपर जाएंट्स संघाचे नेतृत्व देखील केले आहे. एवढेच नाही तर 2018 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे घरचे मैदान हे पुणेच होते. त्यामुळेच कदाचित धोनीने पुण्यात घर घेण्याला पसंती दिली असावी.

आयपीएल 2021ला स्थगिती मिळाल्यानंतर धोनी रांचीमध्ये राहत आहे. येथे तो कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आता सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसेल. बीसीसीआयने आयपीएल 14चे उरलेले सर्व सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होईल.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त – धोनीने गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला टाटा – बाय बाय म्हटल होत. मात्र यानंतर तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने रिटायरमेंटबाबतच्या अनेक बाबी फेल ठरवत निवृत्तीची घोषणा केली होती. तो जगातील असा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वात भारतान वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर कब्जा केला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *