आधी ३ मुली असून देखील ही अभिनेत्री मुलाच्या हव्यासापोटी चौथ्यांदा होत आहे आई

दिल्ली | प्रसिद्ध होतात येण्यासाठी आणि आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी कलाकार काय करतील आणि काय नाही याचा काहीच नेम नसतो. सध्या बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याने एक सुखद वारे वाहत आहेत. चाहते तसेच अनेक कलाकार मंडळी या बातम्यांमुळे खूप खुश आहेत.

नुकतेच अभिनेत्री आलिया भटने ती आई होणार असल्याचे सांगितले. तसेच राणी मुखर्जी देखील आता दुसऱ्यांदा आई होत आहे. यानंतर बॉलीवूडमध्ये कॅटरिना कैफ देखील आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशात आता आणखीन एक पंजाबी अभिनेत्री देखील लवकरच आई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मात्र या अभिनेत्रीने आधीच तीन मुलींना जन्म दिला आहे. आणि आता ती चौथ्यांदा आई होत आहे. तिला आधी तीन मुली आहेत त्यामुळे मुलगा व्हावा म्हणून ती आई होत आहे का असे प्रश्न अनेक चाहत्यांना पडले आहेत. आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेऊ. पंजाबी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने दणाणून सोडणारी ही अभिनेत्री आहे नीरू बाजवा.

या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये देखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्री चा जन्म कॅनडामध्ये झाला. पंजाबी सिनेसृष्टीमध्ये ती काम करत होती त्याचवेळी तिने बॉलीवूडमध्ये देखील नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक देव आनंद दिग्दर्शित ‘मै सोला बरस की’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती प्रिन्स या चित्रपटात विवेक ओबेरॉय बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसली. तिचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाही. नंतर तिने मालिका विश्वामध्ये जाण्याचे ठरवले.

आजही ती अनेक पंजाबी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती आपलं बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तिला पाहून अनेक चाहते मोठ्या गोंधळात पडले आहेत. कारण ती चौथ्यांदा आई होणार आहे. विशेष म्हणजे ती आता ४१ वर्षांची झाली आहे. तिने साल २०१५ मध्ये कॅनडामधील उद्योजक हॅरी जवंदा बरोबर लग्न केले. तिला आधी तीन मुली आहेत आता ती परत एका बाळाला जन्म देणार म्हणून सगळेच चक्रावले आहेत.

मात्र ती प्रेग्नेंट तिच्या रियल लाईफमध्ये नसून रिल लाईफमध्ये आहे. तिचा व्हायरल होतं असलेला बेबी बंपचा फोटो तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. तसेच याला तिने कॅप्शन दिले आहे की, ” बिल्लो आई होणार आहे, तिचा अभिनंदन करण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी झी 5 वर या” असं तिने म्हटलं आहे. तसेच तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या आगामी ब्युटीफूल बिल्लो या आगामी प्रोजेक्ट मधला आहे. अनेक व्यक्ती आता तिच्या या फोटोवर तिला आई होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *