तिन वेळा लग्न करूनही या अभिनेत्रीला मिळाले नाही खरे प्रेम, रहस्यमयी अवस्थेत आढळला तिचा मृतदेह

मुंबई| मर्लिन मन्रोचे फोटो एकदा पाहिले तर ते विसरणे कठीण आहे. तिचे चित्रपट, जीवन, लग्न आणि नंतर मृत्यू… प्रत्येक टप्प्याला एक रहस्य जोडलेले आहे. मर्लिन मनरो हे असे नाव आहे जे तुम्ही ऐकले नसेल, पण तुम्ही ते पाहिले असेल. तिचे सोनेरी केस, गालावर काळे तीळ, ओठांवर लाल लिपस्टिक आणि हाताने पकडलेला तिचा उडणारा ड्रेस हे मूर्तिमंत चित्र आजही अनेकांच्या हृदयात आहे. ज्यांनी ज्यांनी तिचा हा फोटो पाहिला आहे त्या व्यक्तींना तिला विसरणे सोपे नाही. या सर्वोत्कृष्ट हॉलिवूड अभिनेत्रीचा जन्म 1926 मध्ये झाला.

तिच्या आयुष्यामध्ये तिने अनेक कठीण काळा पाहिला. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांबरोबर देखील तिचे नाव जोडले गेले होते. आपल्या आयुष्यात तिने तीन वेळा लग्न केले. मात्र तिन्ही वेळाती प्रेमापासून दूर राहिली. ती दिसायला इतकी हॉट आणि सुंदर होती की कोणीही तिच्या सहज प्रेमात पडेल. आपल्या मादक सौंदर्याने प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री मात्र कायमच खऱ्या प्रेमासाठी झुरत राहिली. आज या बातमीतून या अभिनेत्रीची प्रेम कहानी तसेच तिच्या आयुष्यातील दुःखद टप्प्यांची माहिती जाणून घेऊ.

*वयाच्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*

मर्लिन मनरोच्या आयुष्यात सर्व काही होते. ती प्रसिद्ध होती. तिच्या अभिनयामुळे तिने मोठे वैभव कमावले होते. तरीही तिच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली होती, जी ती भरून काढण्यास असक्षम ठरत होती. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूही अशा प्रकारे झाला की आजपर्यंत या मृत्यूचे गूढ आजुन समोर आलेले नाही.

*वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी केले लग्न*

असे म्हटले जाते की 16 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर, 1942 मध्ये तिने अमेरिकन पोलिस अधिकारी जेम्स डोहर्टीशी लग्न केले. लग्नाच्या एका वर्षानंतर जेम्स नेव्हीमध्ये गेले. यानंतर मर्लिन एका कारखान्यात काम करू लागली. मर्लिनचे नशीब कोणत्या दिशेने वळणार आहे याचा अंदाजही कोणी लावला नसेल.

*एका छायाचित्रकारामुळे नशीब पालटले*

फॅक्टरीत काम करत असताना काही फोटोग्राफर फोटो क्लिक करण्यासाठी तिथे गेले. तेव्हा त्यांना मर्लिनचा चेहरा खूपच फोटोजेनिक वाटला. यानंतर त्यांनी तिचे काही फोटो क्लिक केले. त्यानंतर मर्लिनचे नशीब पालटले आणि तिच्यासाठी ग्लॅमरच्या दुनियेचे दरवाजे उघडले. 1945 मध्ये तिला मॉडेल म्हणून ओळख मिळाली.

*विचित्र कारणाने झाला घटस्फोट*

मर्लिन मन्रोने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. साल 1955 मध्ये आलेल्या ‘द सेव्हन इयर इच’ चित्रपटातील तिचा ‘स्कर्ट ड्रेस’ सीन संस्मरणीय दृश्यांमध्ये गणला जातो. पण या ड्रेसमुळे मर्लिनने तिच्या दुसऱ्या पतीपासून घटस्फोट घेतला. तिच्या पतीने चित्रपटाच्या सेटवर स्कर्ट वरून खूप वाद केला. त्याला हे अजिबात आवडले नाही त्याने खूप गोंधळ घातला. त्यामुळे तिने तिच्या दुसऱ्या पतीला घटस्फोट दिला. मात्र साल 1960 मध्ये मर्लिन मन्रोला ‘सम लाइक इट हॉट’ चित्रपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार देण्यात आला.

*अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांशी जोडले नाव*

1946 मध्ये ती जेम्स डॉगर्टीपासून वेगळी झाली. त्यानंतर 1954 मध्ये तिने जो डिमॅगिओचा हात हातात घेतला. हे नातेही केवळ एक वर्ष टिकले आणि दोघे वेगळे झाले. पुढच्याच वर्षी 1956 मध्ये तिने आर्थर मिलरशी लग्न केले. या लग्नांदरम्यान तिच्या अनेक अफेअर्सचीही चर्चा झाली. यावेळी तिचे नाव अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांशी जोडले गेले होते.

या अभिनेत्रीच्या आयुष्यात खूप संकटे आली. तिच्या कारकिर्दीत ती यशाचे शिखर गाठत होती त्याच वेळी तिच्या आईचे निधन झाले. तसेच आयुष्यात तिला कोणीही प्रेम दिले नाही असे तिच्या अनेक लेखांमधून समोर आले. तिने ४०० हुन आधील पुस्तके लिहिली होती. तसेच अनेक लेख देखील लिहिले होते. ४ ऑगस्ट १९६२ रोजी तिने या जगाचा निरोप घेतला. यावेळी तिने काही औषधे जास्त प्रमाणत घेतली म्हणून तिचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले होते. मात्र हे खरे कारण नाही असे आजही अनेकांचे म्हणणे आहे. तिच्या मृत्यूचे गूढ तिच्या बरोबरच कालवश झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *