रक्षाबंधनाच्या दिवशी एकाच कुटुंबातील ४ व्यक्तींचा मृत्यू; १३ वर्षीय चिमुकलीचां देखील समावेश

दिल्ली | घर आहे तिथे भांड्याला भांडं लागणारचं आणि वाद होणारचं. मात्र हेच वाद जेव्हा विकोपाला पोहोचतात तेव्हा भयावह घटना घडतात. अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. या घटनेत घरातील महिलेने सास, दिर, जाव आणि पुतणीचा खून केला आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी महिलेचे नाव पल्लवी घोष असे आहे तर मृत व्यक्तींची नावे सासू- माधवीवर (५८), दिर – देवाशिष (३६), जाव – रेखा (३१) आणि पुतणी – (१३ ) अशी आहेत. पल्लवीने आपल्या सासरच्या मंडळींची कटरने वार करत हत्या केली आहे. सध्या पल्लवी पोलिसांच्या ताब्यात आहे तसेच तिची कसून चौकशी सुरू आहे.

रक्षाबंधन या सणाचा दिवशीच हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी रात्रीच्या सुमारास जवळपास १०.३० वाजले असता पल्लवीने पाहिले की, वॉशरूम मधील नळ सुरू आहे. यावेळी नळातून बरेचसे पाणी वाया जात आहे. त्यामुळे तिला राग आला. ती सासूला म्हणाली की, घरामध्ये अशा पद्धतीने पाणी वाया जात असेल तर घरात भांडण होणारंच. असे म्हणता म्हणता या दोघींमध्ये वाद सुरू झाला.

हा वाद पुढे खूप विकोपाला गेला. पल्लवीला तिचा राग अनावर झाला. त्यामुळे तिने हातात कटर घेऊन सासूच्या गळ्यावर फिरवले. यावेळी तिचा दिर तिथे धावत आला त्याने पल्लवीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पल्लवीने त्याच्याही गळ्यावर आणि खांद्यावर कटरने वार केले. त्यानंतर तिची जाव आणि पुतणी देखील तिथे आले. त्यावेळी पल्लवीने या दोघींना देखील कटरने मारले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पोलिसांनी सासू, दिर जाव आणि पुतणी यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र कटरचे वार जास्त असल्याने या चौघांचा मृत्यू झाला. सदर घटना एमसी घोष लेन पोलीस हद्दीत घडली आहे. त्यामुळे या पोलिसांनी पल्लवीला ताब्यात घेतले आहे.

घडलेली घटना पल्लवीने जशीच्या तशी पोलिसांना सांगितली. तसेच ती मानसिक रुग्ण असल्याचे देखील यातून समजले. त्यामुळे पोलिसांनी तिचे वैद्यकीय रिपोर्ट तपासण्याचे काम सुरू केले आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढील कारवाई करणार आहेत. यामध्ये पल्लवीचा पती बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना दाट संशय आहे की, या घटनेमध्ये त्याचा देखील हात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *