दुःखद बातमी! दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती रंगवणाऱ्या श्रीधर मुकेरकर यांची प्राण ज्योत मालवली….

पुणे| श्रीमंत दगडूशेठ हलवाईमधील मूर्तीला रंग देणारे रंगकार श्रीधर अंबादास उर्फ अण्णा मुकेरकर यांचे सोमवारी निधन झाले आहे. त्याच्या निधनाने पुणे परिसरात शोक कळा पसरलेली आहे. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा चार मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच निधन वृद्धपकाळाने झाल आहे. दगडूशेठ गणपती प्रमाणेच ते इतरही मंडळातील गणपतींना रंग देण्याचे काम करत होते. वृद्ध कळा लागल्यानंतर मूर्ती रंगवण्याचा त्यांचा हा वारसा मुलगा राजेंद्र आणि नातू अनुपम या दोघांनी चालवला आहे. श्रीधर मुकेरकर यांनी मूर्ती रंगवण्याच्या कामाबरोबरच काशी कापडी समाजाचे सरचिटणीस म्हणून देखील काम केलं आहे. त्यांच्या निधनाने मुकेरकर कुटुंबीय आता शोक व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *