बाबोव! रिषभ पंतचा पाठलाग करत करत उर्वशीने ऑस्ट्रॉलिया गाठली

ऑस्ट्रेलिया | मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतकडून चांगली कामगिरी केलेली नाही म्हणून त्याच्यावरती अनेकांनी टीका केली आहे. त्याचबरोबर एका अभिनेत्रीमुळे त्याची मैदानाबाहेर सुद्धा अधिक चर्चा सुरु आहे. आशिया चषकात अभिनेत्री उर्वशी रौतेला ही दिसल्यापासून ती पंतचा पाठलाग करीत असल्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली.

दिल्लीत रौतेलान पंतला भेटण्यासाठी बोलवलं होत. परंतु पंतन भेटण्यासाठी नकार दिलाय. काही दिवसांपूर्वी पंतचा वाढदिवस झाला. या दिवशी उर्वशीन त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड न करता स्वतःचा फोटो अपलोड केला आणि हॅप्पी बर्थडे… एवढच कॅप्टन दिलं. त्यामुळे सुद्धा ती पुन्हा चर्चेत आली.

काही दिवसातच विश्वचषकाला सुरुवात होणार असल्यानं क्रिकेटचे अनेक चाहते ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. उर्वशी सुद्धा ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. तिन सांगितल; मी माझ्या प्रेमाला फॉलो करत असल्याच आशयात लिहिल आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांनी आत्तापासून दोघांना ट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे.

‘छोटू भैय्या’ नेमकं काय आहे प्रकरण – उर्वशी आणि पंतचे हे प्रकरण उर्वशीच्या एका विधानामुळे सुरू झाल. यावेळी तिन पंतचे नाव न घेता ‘मिस्टर आरपी’ आणि ‘छोटू भैया’ असे शब्द त्याच्यासाठी वापरले होते. त्यानंतर उर्वशी आशिया चषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित राहिली. नंतर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ती पंतची माफी मागताना दिसली. पण हे प्रकरण तरीही शांत झालेल दिसत नाहीये.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *