मातृत्वाला काळींबा! डॉक्टर पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा आईने घेतला जीव…

बंगळुरू | क्रूर्तेचा कहर करून काळजाचा थरका उडवणारी एक बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या चार वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. या महिलेचा हा घाणेरडा प्रकार पाहून सर्व परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सदर महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

उत्तर बेंगळुरूच्या एसआर नगरमध्ये ही घटना घडली आहे. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे सदर महिला ही पेशाने डॉक्टर आहे. मात्र तरीदेखील या महिलेने आपल्या मुलीचा जीव घेतला आहे. या महिलेने चौथ्या मजल्यावरून आपल्या मुलीला खाली फेकले आहे. हे सर्व फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. मुलीला चौथ्या माळ्यावरून खाली फेकल्यानंतर ही महिला देखील खाली उडी घेण्याच्या तयारीत होती.

मात्र या घटनेकडे लगेचच कुटुंबीयांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्या महिलेला वरती खेचून घेतले. समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेची चार वर्षांची मुलगी ही मूकबधिर होती. तिला व्यवस्थित बोलता येत नव्हते आणि ऐकताही येत नव्हते. मुलीमुळे या महिलेला खूप त्रास सहन करावा लागत होता. तिच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागत होते.

तसेच अन्य ठिकाणी तिचा अपमान देखील होत होता. त्यामुळे या महिलेने आपल्या मुलीचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. या आधी देखील या महिलेने आपल्या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडून येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी ती मुलगी बचावली होती. पण मुलीला मारून टाकण्याच्या निर्णयावर तिची आई ठाम होती.

त्यामुळे तिने पुन्हा एकदा मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा हा प्रयत्न सफल झाला. मुलीला मारल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिसांनी असे सांगितले आहे की, या महिलेची मानसिक स्थिती कशी आहे याबाबत आम्हाला काही माहिती नाही. मात्र प्रथम दर्शनी पाहता महिलेने आपल्या मुलीचा खून केला आहे. त्यामुळे आम्ही तिला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *