कॉमेडियन राजू श्रीवास्तव पोहोचले शेवटच्या स्टेजला, प्रकृती होत चालली आहे अधिकच चिंताजनक

मुंबई | दोन दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती. जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक होत चालली आहे.

विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही बदललेली नाही. 24 तास आयसीयूमध्ये ठेवल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत कोणतीच सुधारणा झालेली नाही. यामुळे त्यांचे चाहते अधिकच चिंतेत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या पी आरने काल असे सांगितले होते की, त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज झाले आहेत. त्यामुळे त्यांची ऍन्जिओग्राफी केली जाणार आहे. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर देखील त्यांना 24 तासांहून अधिक वेळ आयसीयूमध्ये ठेवले आहे. मात्र अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच त्यांची तब्येत आणखीन खालावत चालली आहे.

राजू श्रीवास्तव हे एक विनोदी अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक स्टँडअप कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला आहे. “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. आपल्या दमदार विनोदी अभिनयाने त्यांनी आजवर लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

राजू श्रीवास्तव हे सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असतात. आपल्या विनोदी अभिनयाचे अनेक वेगवेगळे व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करतात. त्यांनी आपल्या विनोदाला स्टेज शोमध्ये सुरुवात केली होती. त्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बघता बघता आपल्या विनोदी अभिनयाने ते मोठे स्टार झाले. मात्र आता त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली आहे. सर्व चाहते ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *