Breaking | सिद्धू मुसेवाला मारेकरी आणि पोलिसांमध्ये चकमक; एकाचा जागीच मृत्यू

दिल्ली | सिद्धू सिंग मुसेवला हत्याकांड प्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे. सिद्धूच्या मारेकऱ्यांना शोधून मोठी चकमक सुरू झाली आहे. अमृतसर हिशियानगर गावामध्ये पोलीस आणि त्यांचे मारेकरी आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटांमध्ये गोळीबार सुरू झाला आहे. तसेच यातील एक आरोपी हा मारला गेल्याची माहिती समोर आली आहे.

आमनेसामने जखरुप आणि   मुपा मनपित मनू  अशी सिद्धूच्या मारेकऱ्यांची नावे आहेत. अमृतसर हिशियानगर गावामध्ये हे दोघे असल्याची पोलिसांना खबर मिळाली. खबर मिळताच पोलिसांनी हा परिसर पूर्णतः घेरला आहे. पोलिसांना पाहून या दोघांनी त्यांच्यावर देखील गोळीबार करायला सुरुवात केली.

या चकमकीत तीन पोलिस जखमी झाले आहेत. तसेच यातील एका आरोपीला यमसदनी पाठवण्यात यश आलेलं आहे. पोलिसांनी यातील एका आरोपीला ठार मारले आहे. तसेच दुसऱ्या आरोपीला देखील घेरल असून अजून ही चकमक सुरू आहे.

यामध्ये आता दुसरा आरोपी देखील लवकरच जिवंत पकडला जाण्याची शक्यता आहे. कारण तो स्वतः पुढे येण्यास तयार आहे अशी माहिती समोर आली आहे. दुसरा आरोपी स्वतः हून समोर आला नाही तर पोलीस आता पुन्हा एकदा गोळीबार सुरू करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता दुसरा आरोपी देखील जिवंत अथवा मृत पोलिसांना भेटणार आहे. या मुळे आता सगळीकडे पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सिद्धूला मारल्या नंतर अनेकांवर संशय घेण्यात आले होते. मात्र नंतर आमनेसामने जखरुप आणि   मुपा मनपित मनू   हे दोन आरोपी असल्याचं समजल होतं.

२९ मे रोजी सिद्धू पंजाबमधील एका गावातून आपल्या चारचाकी गाडीने चालला होता. त्याचवेळी या दोघांनी त्याच्या गाडीला घेरलं आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.  गोळीबार होण्याच्या एक दिवस आधी त्याची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली होती.  नंतर लगेचच त्याच्यावर असा गोळीबार झाला.

सिद्धूने आजवर त्याच्या आवाजाने मोठा चाहता वर्ग गोळा केला होता. अशात नवज्योत सिंग  सिद्धू बरोबर त्याची चांगली मैत्री होती. हे दोघे अनेकदा एकमेकांना भेटायचे. त्यामुळेच सिद्धूला काँग्रेसमध्ये घेण्यात आले. अशात पक्षात आल्यानंतर त्याने विधानसभेची एक निवडणूक देखील लढवली. मात्र निवडणुकीत तो अयशस्वी ठरला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *