सिनेसृष्टी हादरली! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन केली आत्महत्या

दिल्ली | बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिचे निधन झाले आहे. तिने बंगाली सिनेसृष्टीत अनेक मोठमोठे चित्रपट केले होते. तसेच तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते. तिच्या आकस्मित निधनाने बंगाली सिनेसृष्टी हादरून गेली आहे. पल्लवी तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तिचा मृतदेह त्यांना पंख्याला लटकलेला आढळला. अभिनेत्रीने फाशी घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे.

 

 

प्राथमिक तपासाच्या आधारे, पोलिसांचे म्हणणे आहे की, पल्लवीचा मृत्यू आत्महत्येनेच झाला आहे. मात्र अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेंड वर तिच्या निधनाचा आरोप लावला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी पल्लवीचा लिव्ह-इन पार्टनर साग्निक चक्रवर्ती याचीही चौकशी करत आहेत.

 

 

साग्निकच्या पालकांनी, तथापि, सर्व आरोप नाकारले आणि म्हणाले की तरुण जोडप्यामध्ये कोणतीही मोठी समस्या नाही. मीडियाशी बोलताना साग्निकची आई म्हणाली, “ते दोघे एकत्र राहत होते. आमचा पूर्ण पाठिंबा नसला तरी ते मोठे असल्याने आम्ही त्यांना परवानगी दिली. काही वेळा मी साग्निकला लग्न झाल्यावर दुसरीकडे राहायला आणि एकत्र राहायला सांगितलं होतं. त्यांना कोणतीही मोठी समस्या नव्हती. मला माहित नाही काय झाले.”

 

१५ मे २०२२ रोजी या अभिनेत्रीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. यावेळी तिचे वय फक्त २१ वर्षे होते. पल्लवी डेच्या अभिनयाबद्दल सांगायचं झाले तर अभिनेत्रीने कुंजा छाया, मोन माने ना, रेशम झापी आणि अशा अनेक लोकप्रिय बंगाली मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या अकाली निधनाने संपूर्ण बांगला टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *