सिनेसृष्टी पुन्हा हादरली! दिग्गज अभिनेत्याचे निधन; अनेक प्रसिध्द मालिकांमध्ये केले होते काम

दिल्ली:मनोरंजन विश्वातून आणखीन एक दुःखद बातमी समोर येत आहे. एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. या अभिनेत्याच्या निधनाने गुजराती आणि हिंदी सिनेसृष्टीवर मोठी शोक काळा पसरली आहे. या अभिनेत्याने आजवर अभिनय क्षेत्रात खूप मोठे नाव कमावले मात्र एका गंभीर आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

 

 

टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी निधन झाले. गेले बरेच दिवस ते डायलिसिस वर होते. किडनीच्या आजाराने त्यांना खूप त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्तीचे उपचार केले. पंधरा दिवस त्यांनी आपल्या मृत्यूशी झुंज दिली.मात्र डॉक्टरांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे वयाच्या 65 व्या वर्षी या दिग्गज अभिनेत्याचा मृत्यू झाला.

 

अभिनेत्री केतकी दवे यांचे रसिक दवे हे पती होते. महाभारत मधील नंदा हे पात्र रसिक दवे यांनी साकारले होते. आजही अनेक चाहते त्यांना या पात्रासाठी ओळखतात. सीआयडी या मालिकेमध्ये देखील त्यांनी अभिनय केला होता. तसेच कृष्णा या आध्यात्मिक मालिकेमध्ये देखील त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. त्यांनी अनेक गुजराती मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे गुजराती भाषेत त्यांचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे.

 

 

यांनी आपल्या अभिनयात गुजराती आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये खूप कामे केली. ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असायचे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा होता. त्यांच्या निधनानंतर दवे कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांचे चाहते देखील सोशल मीडिया वरती दुःख व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *