सिनेसृष्टी हादरली! १००हून अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

मुंबई | सिने सृष्टीमध्ये मोठ्या खळबळ जनक घटना घडत आहेत. दिवसेंदिवस एका ना एका कलाकाराचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे सिने विश्वात संपूर्णता शोक कळा पसरलेली आहे. दुःखांच्या बातम्यांचा हा डोंगर संपत नाही तोच आणखीन एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

 

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम करतो आणि हे खर प्रेम जेव्हा धोका देतं तेव्हा होणाऱ्या वेदना ह्या असह्य असतात. अशीच प्रेमाच्या विळख्यात असलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी जिने बालिका वधू ही मालिका खूप गाजवली. या अभिनेत्रीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 

 

 

बालिका वधू या मालिकेमुळे या अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या आयुष्यामध्ये खूप सुखाचे दिवस आले होते. मात्र तिच्या बॉयफ्रेंडला तिचे सुख पहावले नाही. प्रेमात येत असलेल्या सततच्या नैराश्यामुळे या अभिनेत्रीने मोठे टोकाच पाऊल उचललं. तिने या जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय सर्वांना मोठा धक्का देऊन गेला. आजही अनेकांच्या आठवणींमध्ये तिची प्रतिमा कायम आहे. तर आता या अभिनेत्री प्रमाणे आणखीन एक हृदय द्रावक घटना घडली आहे.

 

 

ओडिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथील ओडीसाई अभिनेत्री रश्मीरेखा हिने आपल्या आयुष्यात असाच एक मोठा निर्णय घेतला आणि कायमचं सर्वांना अलविदा केलं. रश्मी रेखाने देखील मागचा पुढचा कोणताच विचार न करता आपलं जीवन संपवल आहे. तिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या निधनामुळे सर्वत्र मोठे खळबळ उडालेली पाहायला मिळते. तिने देखील प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 

 

रश्मीरेखाच्या प्रियकराचे नाव संतोष पात्रा असे आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर संशयाची सुई संतोष कडे वळत आहे. रश्मीरेखाच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मोठे वाद सुरू होते. संतोष तिला समजून घेत नव्हता. तो तिच्याशी खूप भांडण करायचा. त्यामुळेच तिने हा मोठा टोकाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली आहे.

 

 

संपूर्ण प्रकरणावर रश्मी रेखाच्या वडिलांनी असे सांगितले आहे की, ” माझी मुलगी आणि संतोष गेल्या दीड महिन्यांपासून एकत्र राहत होते. ते दोघे लिवइन रिलेशनशिपमध्ये होते. आमच्या मुलीच्या सुखामध्येच आमचं सर्व सुख होतं.

 

 

मात्र काही दिवसांनी या दोघांमध्ये खूप भांडणे होऊ लागली. त्यामुळे शनिवारी मी माझ्या मुलीला खूप फोन करत होतो. मला तुझी खुप आठवण येत होती. मात्र तिने माझा फोन उचलला नाही. मला असे वाटले की ती कामात असेल. मात्र दुसऱ्या दिवशी देखील तिने कोणताही फोन केला नाही. “

 

पुढे ते म्हणाले की, ” मुलीचा फोन येत नाहीये हे समजल्यावर मी अस्वस्थ झालो. त्यानंतर तिच्या प्रिय करायचा मला फोन आला. माझ्या मुलीने गळफास घेतल्याची बातमी मला त्यानेच सांगितली.” शनिवारी संतोष आणि रश्मीरेखा या दोघांचे भांडण झाले होते.

 

त्यामुळे संतोष घर सोडून निघून गेला होता. तू रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला. त्यावेळी रश्मीरेखा त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. सदर घट नाही आत्महत्येची असली तरी देखील रश्मी रेखाच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सदर घटनेचा अधिक कसून तपास करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *