“चाय गरम, गरम बांगड्या गरम बांगड्या…”, या एकाच डायलॉगने प्रसिद्ध झालेली झेंडू आता दिसते खूपच ग्लॅमरस आणि हॉट, पाहा तिचे लेटेस्ट फोटो….

पुणे | बाल कलाकार असलेले अनेक चित्रपट येत जात असतात. मात्र हे बाल कलाकार कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहता. बाल कलाकारांचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहतो. त्यामुळे बालकालाकारांवर आधारित चित्रपट प्रचंड गाजतात. या चित्रपटांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होते.

काही काळाने चित्रपटात दिसलेले बालकलाकार सध्या काय करत आहेत? ते कसे दिसतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अशात काही बालकलाकार हे एकाच चित्रपटामध्ये दिसतात. त्यानंतर ते अभिनयापासून दूर जातात. तर काही बालकलाकार आणखीन मेहनत घेऊन स्वतःच्या अभिनयात आणखीन सुधारणा करतात. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सची रांग लागते.

आतापर्यंत असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी पहिल्या चित्रपटामध्ये अफाट प्रसिद्धी मिळवली. मात्र त्यानंतर ते रुपेरी पडद्यावर फार कमाल करू शकले नाही. त्यामुळे त्यांनी यापासून दूर जाऊन वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैराट या चित्रपटातील सल्या आणि लंगड्या. अभिनय क्षेत्राशी या दोघांचा काहीही संबंध नव्हता. मात्र तरी देखील सैराट या चित्रपटात या दोघांनी चांगलीच हवा केली. त्यानंतरच्या काही मुलाखतींमध्ये त्यांनी पुढे अभिनयातच करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सद्यस्थितीला त्यांच्याकडे हवे तसे काम नाही.

अशात काही वर्षांपूर्वी एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची लोकप्रियता फार होती. चित्रपटामध्ये दोन बालकलाकार होते. ज्ञाना आणि झेंडू या दोन्हीही बालकलाकारांनी हा चित्रपट खूप गाजवला होता. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने चांगली कमाई केली होती. अशात चित्रपटात दिसलेली ही झेंडू आता बरीच मोठी झाली आहे. ती सध्या नेमकी काय करते? तसेच ती कशी दिसते याचविषयी या बातमीतून जाणून घेऊ.

“गरम चाय गरम चाय ये बांगड्या गरम बांगड्या गरम…..” या डायलॉगने झेंडू प्रचंड प्रसिद्ध झाली. आजही या डायलॉग वरती अनेक व्यक्ती रील व्हिडिओ बनवताना दिसतात. हा डायलॉग बोलणारी ती झेंडू म्हणजेच अभिनेत्री सायली भंडारकवठेकर. सायली या चित्रपटामध्ये अगदी लहान होती. चित्रपटामध्ये पंढरपूरच्या वारीचे चित्रण दाखवले होते. त्याचबरोबर झेंडू आणि ज्ञाना या दोघांनी या चित्रपटातील प्रेक्षक वर्ग धरून ठेवला होता.

चित्रपटातील झेंडू फारच अघाव होती. मात्र तितकीच ती हुशार देखील होती. आपल्या एलिझाबेथ साठी झेंडूने खूप मेहनत घेतली. हीच झेंडू म्हणजे सायली आता खूप मोठी झाली आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा आताचा फोटो पाहून ही एलिझाबेथ या चित्रपटातील झेंडू आहे हे कुणालाही खरं वाटत नाही. तिच्या चेहऱ्यामध्ये बराच बदल झाला आहे.

सायली आता खूपच सुंदर दिसत असून ग्लॅमरस पद्धतीने राहते. तसेच तिचे काही हॉट फोटो देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत. तिच्या या फोटोंना चाहते भरभरून प्रेम देत आहेत. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोईंग देखील तगडी आहे. सायली सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. तिला नृत्याची प्रचंड आवड आहे. भरत नाट्यम या नृत्यात करिअर करण्याचा निर्णय तिने घेतलाय. सध्या ती यातून नृत्याची प्रॅक्टिस करत आहे तसेच त्यासाठी तिने क्लासेस देखील लावले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *