वाढदिवस साजरा केला अन् छातीत दुःखू लागलं! काही वेळात होत्याचं नव्हतं झालं अन् जवानाचे निधन झाले

मुंबई | तरुणांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं प्रमाण अधिकच वाढत आहे. मागील काही वर्षांपासून देखील याच घटना घडत आहेत. गेल्या दोन वर्षात काही कलाकार देखील हृदयविकारान मृत्यू पावत आहेत. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील बेरी गावातील जवान नरेंद्र सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नरेंद्र कुमार हे फक्त 27 वर्षांचे होते आणि निधनाच्या एक दिवसापूर्वीच त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

नरेंद्र सिंग हे भारतीय नौदलात हवालदार पदावर कार्यरत होते. सध्या त्यांची ड्युटी मुंबईत होती. तिथेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मूळ गावी बेरी येथे त्यांचं पर्थिन नेण्यात आल. अशावेळी गावातील लोकांना ही बातमी कळताच संपूर्ण गवण शोक व्यक्त केला. यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी बेरी येथे राजकीय सन्मानासह अखेरचा निरोप देण्यात आला.

अखेरचा वाढदिवस साजरा केला आणि काळान घाव घातला – नरेंद्र सिंह यांच यावर्षी डिसेंबर महिन्यात विवाह होणार होता.1 ऑक्टोंबरला त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाढदिवस देखील साजरा केला. काही सहकाऱ्यांसह गेला तेव्हा त्याला रात्री छातीत दुखू लागले.

हृदयविकारान घेतला अखेरचा श्वास – त्यानंतर नरेंद्र सिंग यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. नरेंद्र सिंह यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. गावात नौदलाच्या अधिकाऱ्यांनी लष्करी इतमामात शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *