अक्षय कुमारचा कॅप्सुल गिल चित्रपटातील फस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल…

मुंबई | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या रक्षाबंधन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. अशात या कामाबरोबच तो त्याच्या आणखीन एका आगमी चित्रपटाच्या शूटिंगला लागला आहे. जराही ब्रेक न घेता त्याचे आगामी चित्रपटाच्या शूटिंगचे काम सुरू आहे. तसेच यातील त्याचा फास्ट लूक सोशल मीडियावर आला आहे. त्याचा हा लूक पाहून सर्व जण चर्चा करत आहेत.

डोक्यावर पडगी, डोळ्यात एक वेगळी धमक, पिळदार शरीरयष्टी आणि डोळ्यावर चष्मा असा त्याचा हा लूक समोर आला आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे कॅप्सुल गिल. या चित्रपटात तो जसवंत गिल हे पात्र साकारणार आहे. त्याचा हा लूक याच पात्राचा आहे. हा चित्रपट जसवंत गिल यांच्या आयुष्यातील खऱ्या काहानिवर आधारित आहे.

या चित्रपटात अक्षय बरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. केसरी या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. या जोडीला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी पुन्हा एकदा हे दोघे एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित कॅप्सुल गिल या चित्रपटाची निर्मिती पूजा एन्टरटेन्मेंट आणि अजय कपूरच्या कायता प्रॉडक्शन करत आहेत. तसेच अक्षयचा हा लूक टिनू सुरेश देसाई यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

अक्षयचा हा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण त्याला या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा देत आहेत. तसेच चाहत्यांना त्याचा लूक खूप आवडला आहे. त्याचा हा फोटो खूप जोरदार व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखले जाते. त्याने आजवर अनेक सामाजिक विषयावर आधारित चित्रपट बनवले आहेत. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतो.

तसेच समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आपले मत परखडपणे मांडत असतो. त्याने प्रत्येक विषयावर दिलेली प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडते. तसेच अनेक जण त्याच्या मताशी नेहमी सहमती दर्शवतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *