स्वतःवर वा’र करत या अभिनेत्याने केला आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न; दवाखान्यात देत आहे मृत्यूशी झुंज

मुंबई | मनोरंजन विश्वातून दिवसेंदिवस खळबळजनक बातम्या समोर येतच आहेत. अनेक कलाकार स्वतःचे जिवन सपवंत आहेत तर काही जण अपघातात मृत्यू पावत आहेत. त्यामुळे प्रेक्षक खूप चिंता ग्रस्त झाले आहेत. अशात आता एका बंगाली अभिनेत्याने स्वतःचाच जीव घेण्याचा म्हणजेच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

बंगाली मालिका विश्वातील दिग्गज अभिनेते सैबल भट्टाचार्य यांनी स्वतःच्या आयुष्यातील अडचणींना कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच त्यांचा हा व्हिडिओ देखील बाहेर आला आहे.

सैबल यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर वार करून घेतले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या हे लक्षात आल्यावर रक्ताच्या थारोळ्यातून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून अजून त्यांच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा झाली नाही.

त्यांची प्रकृती अजून चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे. आत्महत्या करताना त्यांनी स्वतः त्यांचा व्हिडिओ बनवला होता. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर देखील टाकला आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांचा चेहरा रक्त बंबाळ झालेला दिसतो आहे. तसेच “मी हे माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून करत आहे.” असे त्यांनी यात म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नी बरोबरच त्यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांचा देखील उल्लेख केला होता.

सैबल यांनी आजवर बंगालीमध्ये उरोन टुब्री, अमर दुर्गा, मिठाई, कोरी खेला अशा काही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी कमी कामे केली असली तरी त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सर्वच चाहते त्यांच्या परकृती विषयी चिंता व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *