बंटी तेरा साबून स्लो है क्या; या जाहिरातीमधील मुलगी आज करतेय हे काम

 

मुंबई | तुम्हाला ‘बंटी तेरा साबण स्लो है क्या’ या जाहीरातीतील मुलगी माहित असलेच. काही वर्षांपूर्वीच्या या जाहीरातीतील मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. लाईफ बॉय साबणाच्या अनेक जाहीरात झाल्या. पण त्या जाहीरातीतील ती गोंडस मुलगी आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे.

 

लाईफ बॉयच्या या जाहिराती मध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी आज 21 वर्षाची झाली असुन ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसते. ती नेहमी तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीच नाव आहे अवनीत कौर. अवनीत कौर आता सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय सेलिब्रिटी आहे.

 

अभिनेत्री, मॉडल आणि डान्सर म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली असून इन्स्टाग्रामवर 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असते याला लाखोने लाईक्स आणि कमेंट मिळतात. वयाच्या 19 व्या वर्षी अवनीतला ‘मोस्ट स्टायलिस्ट इन्फ्यूएन्सर’ हा पुरस्कारही मिळालाय.

 

सब टीव्हीवरील अलादीन या मालिकेत अवनीत कौरने प्रिन्सेस यास्मिनीच भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तीने अनेक सिनेमा आणि मालिकांकधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

 

या मालिकांमध्ये अवनीतने केलंय काम
डान्स इंडिया डान्स, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा, या सारख्या कार्याक्रमांमध्येही ती सहभागी झाली होती. ‘मेरी माँ’, ‘सावित्री’, ‘एक मुठ्ठी आसमान’, ‘हमारी सिस्टर दीदी’, ‘ट्विस्टवाला लव्ह’ सारख्या मालिकांमध्ये अवनीतने काम केलं आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *