Breaking – सलमानवर चाकूने सपासपा वा’र, रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक 

मुंबई | भारतीय वंशाचे मात्र ब्रिटिश नागरिकत्व असलेले लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात त्यांच्यावर एका इसमाने चाकूने वार केले आहेत. यात रश्दी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात सलमान गेले होते. त्यावेळी भाषण करण्यासाठी ते स्टेजवर गेले असता. एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन त्यांना वाईट साईट बोलत धक्के देऊ लागला. त्यानंतर कोणी काही करणार तोपर्यंत त्याने सलमान यांच्यावर वार केले. मात्र आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

सलमान रश्दी यांचा जीव घेतल्यास मोठे बक्षीस

सलमान रश्दी यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी ‘द सॅटॅनिक व्हर्स’ शीर्षक असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना बुकर पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या या पुस्तकाला साल १९८८ पासून इराणमध्ये बंदी आहे. मुस्लिम धर्माचा यामध्ये अपमान केला गेला असल्याचे दावे केले जात आहेत. इराणमधील दिवंगतनेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. यांनी रश्दी यांची हत्या केल्यास तीन लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.

 

 

सलमान रश्दी यांनी आतापर्यंत आपल्या लेखणीतून अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. आपल्या परखड मतांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यासाठी त्यांना बऱ्याचदा धमक्यांचा देखील सामना करावा लागला आहे. मात्र यावेळी त्यांच्या जीवावर बेतले आहे. एका कार्यक्रमांमध्ये भाषण देण्यासाठी जेव्हा ते मंचावर उभे राहिले तेव्हाच एका अज्ञात व्यक्ती त्यांच्यासमोर आला.

 

 

बातचीत न करता तो त्यांना ओरडू लागला आणि धक्काबुक्की करू लागला. त्यानंतर त्याने आपला धारदार चाकू बाहेर काढत रश्दी यांच्यावर वार केले. हा प्रकार पाहून कार्यक्रमातील सर्व व्यक्ती हवालदिल झाल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या रश्दी यांना ए आर ॲम्बुलन्सने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सदर घटनेची पोलिसांनी नोंद केलेली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच रश्दी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *