बॉलीवूडचे दादा मुनी यांची नात देखील दिसते खूप सुंदर; एकेकाळी रेखाला दिली टक्कर

मुंबई | बॉलीवूडला आपल्या दमदार अभिनयाने दिवाणे करणारे अभिनेते म्हणजे दादा मुनी. अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांच्या कारकीर्दीत बॉलीवूडवर मजबूत पकड बनवली आहे. त्यांच्या काळात ते एक प्रसिद्ध हिरो होते. त्यामुळेच आजही त्यांना दादा मुनी या नावाने ओळखले जाते. त्यांचा अभिनय फार कुशल होता.

त्यांचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे आई वडील एक मध्यमवर्गीय नागरिक होते. त्यामुळे इलाहाबाद येथील एका विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहापणापासूनच त्यांना चित्रपट पाहायला खूप आवडायचे. यावेळी आपण देखील एक सुंदर चित्रपट बनवला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यांना नेहमीच एक निर्माते म्हणून काम करायचे होते.

मात्र त्यांच्या कारकिर्दीच जहाज अभिनयाच्या दिशेने वळल. त्यांचे एक खूप चांगले मित्र होते. त्यांच्या मित्राचं नाव शशधर मुखर्जी असे आहे. ते बॉम्बे टॉकीजमध्ये काम करत होते. अशोक यांनी आपल्या बहिनेचे लग्न देखील मित्रा बरोबर लावून दिले होते. त्यावेळी अशोक एक लेबोरेट्री असिस्टंट म्हणून काम करत होते. काही दिवसांनी त्यांच्या मित्राने त्यांना बॉम्बे टॉकीजला बोलवून घेतले. तिथूनच अशोक कुमार यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

त्यांनी त्या काळी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत भारत सरकारने त्यांना पद्म भूषण हा पुरस्कार देखील दिला होता. एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्याची नात देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिचं नाव अनुराधा पटेल आहे. रेखाच “मन क्यू बेहका रे बेहका…..” हे गाणं तुम्ही जरूर पाहिलं असेल.

यात रेखा बरोबर अनुराधा देखील आहे. या गाण्यातून आणि या चित्रपटातून अनुराधाला देखील खूप प्रसिध्दी मिळाली. 1983 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट लव इन गोवा मधून अनुराधाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती धर्माधिकारी, रुखसत, सदा सुहाग अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

तिने देखील आपल्या दमदार अभिनयाने खूप कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळवली. नंतर तिने लग्न केले आणि अभियनीतून काढता पाय घेतला. त्यानंतर ती एकूण 10 वर्षे अभिनय क्षेत्रात दिसलीच नाही. आता पुन्हा एकदा तिने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. जाने तू या जाने ना तसेच सलमान खानच्या रेडी या चित्रपटात ती दिसली होती. इथे तिला सहाय्यक भूमिका मिळाल्या. ती आता मुंबईमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून काम करते. तिचे स्वतः चे याचे एक इन्स्टिट्यूट होते.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *