प्रसिद्ध गायिकेच्या निधनाने बॉलीवूड हादरलं! हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू; ३०० हून अधिक गाण्यांना दिला होता आवाज

मुंबई | मनोरंजन विश्वात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दिग्गज गायीकेने या जगाचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड वर शोककाळा पसरली होती. मिथिलेश चतुर्वेदी यांनी कोई मिल गया या चित्रपटात अभिनय केला होता. अभिनेता ऋतिक रोशन बरोबर त्यांनी या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट जबरदस्त गाजला होता. त्यांनी साकारलेली कम्प्युटर शिक्षकाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली होती.

मनोरंजन विश्वात त्यांनी आपल्या प्रत्येक पात्राला उत्तमपणे साकारले. मिथिलेश चतुर्वेदी यांच्याबरोबरच नुकतेच रमेश देव, लता मंगेशकर, दीपेश भान, रसिक दवे या कलाकारांचा देखील मृत्यू झाला आहे. रसिक दवे यांनी देखील अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी केली.

मूत्रपिंडाचा आजार झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी कृष्णा या मालिकेमध्ये अभिनय केला होता. त्याचबरोबर सीआयडी या कार्यक्रमामध्ये देखील ते झळकले होते. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रेम करायचे. मात्र त्यांचे देखील काही दिवसांपूर्वीच निधन झाले.

तसेच गेल्या वर्षी ऋषी कपूर आणि इरफान खान अशा हरहुन्नरी अभिनेत्यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांनी त्यांच्या काळात अभिनय क्षेत्राला चार चांद लावले होते. तर इरफान खान यांच्या प्रत्येक भूमिका रुपेरी पडल्यावर गाजल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्यांच्या निधनाने बॉलीवूड हादरून गेले होते. अशात आता आणखीन एका प्रसिद्ध गायिकेचे निधन झाले आहे. बॉलीवूडमध्ये या गायिकेने अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

नुकतेच निधन झालेल्या या प्रसिद्ध गायिकेचे नाव निर्मला मिश्रा असे आहे. हिंदी बरोबरच बंगाली सिनेसृष्टीमध्ये त्यांनी आपल्या आवाजाने सर्वांना घायाळ केले होते. चित्रपटांमध्ये निर्मला यांची गाणी असल्यास तो चित्रपट खूप हिट व्हायचा. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. निर्मला यांना त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

यावेळी घरातील सर्व सदस्य घाबरून गेले. तात्काळ निर्मला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अजूनही सोशल मीडियावर अनेक व्यक्ती शोक व्यक्त करत आहेत.

निर्मला यांना लहानपणापासूनच गोड गळा आहे. त्यामुळे लहानपणी त्या सतत गाणी गुणगुणत असायच्या. त्यांच्या आई-वडिलांच्या हे लक्षात आले की आपली मुलगी एक मोठी गायिका होऊ शकते. त्यामुळे त्यांनी लहानपणीच तिला संगीताचे धडे दिले. तेव्हापासून निर्मला यांनी गायला सुरुवात केली. शाळेत असताना शाळेतील अनेक कार्यक्रमांमध्ये त्या गाणी गायच्या. पुढे त्यांनी बॉलीवूडमध्ये देखील अनेक गाणी गायली. त्याचबरोबर बंगाली, तमिळ, मल्याळम अशा भाषांमध्ये देखील त्यांनी आपल्या आवाजाने चाहता वर्ग गोळा केला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *