बॉलिवूड हादरलं! शूटिंग दरम्यान दिग्गज अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

मुंबई | सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना मरण आले. शूटिंग सुरू असताना ते बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेने मल्याळम सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली आहे.

 

 

 

वक्कम येथील टोविनो थॉमस यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते सेटवर उपस्थित होते. यावेळी एक सीम शूट करून झाल्यानंतर ते तिथेच थांबले होते. त्यांनी नाश्ता केला मग थोड्या वेळासाठी ते बाथरूम मध्ये गेले. त्यावेळी बराच वेळ झाला मात्र ते परत आले नाही. त्यामुळे सेट वरील इतर मंडळी घाबरली. त्यांनी धावपळ करत खालिद यांचा शोध घेतला.

 

 

 

यावेळी एका व्यक्तीला ते बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. यावेळी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी सुरुवातीला अलेप्पी या थेटर मध्ये बराच काळ काम केले. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावरती आपले नशीब आजमावले. त्यांची मरिमयम ही मालिका खूप गाजली होती.

 

 

या मालिकेत त्यांनी सुरेश हे पात्र साकारले होते. या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप दाद मिळाली. याच मालिकेमधून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र छोट्या पडद्यावर असलेली त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांनी पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण केले. त्यांचा अभिनय अतिशय दांडगा होता. त्यांच्या निधनामुळे सर्वच चाहते दुःख व्यक्त करत आहेत.

 

व्ही पी खालिद यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत लाखो रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ते उत्तम विनोदी अभिनेते देखील होते. त्यांच्या विनोदामुळे प्रेक्षक वर्ग खळखळून हसायचा. त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यामुळेच त्यांची पसंती फार होती. मात्र त्यांचे आकस्मित निधन अनेकांना दुःखात टाकून गेले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *