बॉलिवुड हादरलं! लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन; वयाच्या ९२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई | ज्येष्ठ मराठी-हिंदी अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 12 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. वत्सला देशमुख नाग पंचमी, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, माई माऊली यांसारख्या चित्रपटांचा झळकल्या होत्या. पिंजरा या चित्रपटात त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली.

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांनी 12 मार्च रोजी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. अभिनयात सक्रिय असताना, वत्सला देशमुख यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मनसे चित्रपत सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. त्यांनी लिहिले होते की, “सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपत कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली….!!!!!”

वत्सला देशमुख या कलाकारांच्या कुटुंबातील होत्या. त्या लोकप्रिय नाट्य कलाकार श्रीधरपंत देशमुख यांच्या कन्या होत्या. मुंबईत आल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. वत्सला देशमुख या लोकप्रिय मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत्या, ज्यांनी मार्च 2000 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

तुफान और दियामध्ये नृत्यांगना म्हणून काम करण्यापासून ते लोकप्रिय मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्सचा भाग होण्यापर्यंत, वत्सला देशमुख यांची पोकळी कायम राहील. नवरंग, इये मराठी चे नगरी, अजब तुझे सरकार, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, सुहाग या तिच्या उल्लेखनीय कामांचा समावेश आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड होत आहेत. काही दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांचे देखील निधन झाले. गाणं कोकिळा हरपल्याने सगळ्यांवरच दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या निधनानंतर दोन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर केला होता.

त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अनेक चाहत्यांना या दिवशी शोक आवरत नव्हता. त्यांची सुमधुर गाणी आजही चहा त्या आवडीने पाहतात आणि ऐकतात. त्या जरी आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचा आवाज हा अजरामर झालेला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *