बॉलिवूड हादरलं! दिग्गज अभिनेत्याचे निधन; २००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

दिल्ली | बॉलिवूडमध्ये सतत निधनाच्या बातम्या वाढत आहेत. सतत कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याचे अथवा अभिनेत्रीचे निधन झाल्याचे समजत आहे. अशात आता यात आणखीन एक नाव सामील होत आहे. दिग्गज अभिनेते मिथेलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे.

३ ऑगस्ट रोजी मिथीलेश यांनी मृत्युला कवटाळले. त्यांना आधी एक हृदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. हवा पालट व्हावा म्हणून त्यांना गावी घेऊन जाण्यात येत होते.

गावी गेल्यावर त्यांची तब्येत आणखीन बिघडली. यात त्यांचा लखनौ येथे मृत्यू झाला. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. हृतिक रोशन या अभिनेत्याच्या कोई मिल गया या चित्रपटात ते दिसले होते.

यावेळी त्यांनी साकारलेली माथूर सरांची भूमिका अनेकांना आवडली होती. त्यांनी गदर एक प्रेम कथा, मोहल्ला, रेडी, फिजा अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तसेच स्कॅम १९९२ या प्रसिद्ध वेब सिरीज मध्ये देखील त्यांचा अभिनय पाहायला मिळाला.

त्यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक जण सोशल मीडियावर त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता हृतिक रोशन याने देखील त्यांच्या निधनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *