बॉलीवुड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचा मृत्यू; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

मुंबई | दक्षिणातील सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. दाक्षिणात्य अभिनेता सरथ चंद्रन याचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 37 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेता अँटोनी वर्गीस यांनी त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरथ चंद्रनच्या निधनाची बातमी ट्विट करत अभिनेता अँटोनी वर्गीस यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

 

 

मल्याळम चित्रपटांचा एक भाग असलेल्या अभिनेत्याच्या निधनामुळे दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक व्यक्तींना त्याच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. तसेच अजूनही त्याच्या मृत्यूचे गूढ मात्र अस्पष्ट आहे.

 

 

सरथ चंद्रन हे देखील अभिनय क्षेत्रत सक्रिय आहेत. त्यांनी अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ‘अंगमली डायरीज’मधील सरथ चंद्रनचा एक फोटो शेअर केला आणि “RIP ब्रदर.” असे लिहिले आहे.

 

 

37 वर्षीय अभिनेता त्याच्या ‘अंगमली डायरीज’ चित्रपटामुळे मिठी प्रसिध्दी मिळवली. हा एक मल्याळम चित्रपट आहे. या चित्रपटाबरोबरच त्याने ‘कुडे’, ‘ओरू मेक्सिकन अपरथा’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

 

 

साल 2017 मधील मल्याळम अॅक्शन-ड्रामा चित्रपट अंगमली डायरीजमध्ये तो शेवटचा दिसला. या चित्रपटाचे दिग्दर्शन लिजो जोस पेलिसरी यांनी केले होते. या चित्रपटात अँटोनी वर्गीस, रेश्मा राजन आणि बिन्नी रिंके बेंजामिन यांच्याही भूमिका होत्या.

 

सरथ चंद्रन हा मूळचा कोची येथील आहे. त्याने चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी खूप संघर्ष केला. त्याचा संघर्ष देखील अनेकांसाठी आदर्श आहे. त्याला आधीपासूनच अभियनयाची गोडी होती. मात्र सुरुवातीला त्याने एका आयटी फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली.

 

 

 

या आयटी फर्ममध्ये काम करण्यासोबतच तो डबिंग आर्टिस्ट म्हणूनही चित्रपटांमध्ये काम करत होता. त्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘अनिस्या’ या चित्रपटातून केली. त्याचे आता निधन झाले असेल तरी अजूनही त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *