बॉलीवूड पुन्हा हादरले! स्कॅम 1992 मधील दिग्गज अभिनेत्याचे निधन; देशावर शोककळा

मुंबई | सध्या मनोरंजन विश्वात एकामागून एक दुःखद घटना समोर येत आहेत. ‘स्कॅम 1992’ आणि ‘कोई मिल गया’ मधील अभिनयातून घराघरात पोहोचलेले अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे प्रतीक गांधी, ऋतिक रोशन तसेच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

मिथिलेश चतुर्वेदी हे 63 वर्षांचे झाले होते. हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तातडीने त्यांना कोकिलाबेन धिरुबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते. दहा दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पहाटे चारच्या सुमारास त्यांना हा झटका आला त्यामुळे यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

त्यांच्या निधनामुळे बॉलीवूड वर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडिया मार्फत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे मात्र मुलगा अजून लहान असून तो अद्याप अविवाहित आहे.

मिथिलेश चतुर्वेदी यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले याबद्दल एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांच्याशी चर्चा झाली. आशिषने सांगितले की, “मिथिलेश चतुर्वेदी यांना गुरुवारी पहाटे ४ वाजता छातीत तीव्र वेदना होत होत्या.

 

गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 10 दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचे निधन झाले.”

हृतिक रोशनसोबतचा ‘कोई मिल गया’ असो किंवा सनी देओलसोबतचा ‘गदर: एक प्रेम कथा’ असो, सलमान खानसोबतचा ‘रेडी’ असो किंवा ओटीटीवर रिलीज झालेली ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिज असो, मिथिलेश चतुर्वेदीही अनेक छोट्या भूमिकांमध्ये दिसले. ते अनेक मुलांचे लाडके होते. टीव्हीवरील ‘ नीली छत्री वाले’ मधील अभिनयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली होती.

15 ऑक्टोबर 1954 रोजी लखनौमध्ये जन्मलेले मिथिलेश चतुर्वेदी 68 वर्षांचे होते. 1998 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ या चित्रपटातील बिल्डर मल्होत्राच्या भूमिकेतून त्यांना पहिल्यांदा लोकप्रियता मिळाली . त्यांनी 1997 मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु त्या चित्रपटातील त्यांची भूमिका राहिली. त्यांनी 1999 मध्ये सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटातही काम केले होते. ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘स्कॅम 1992’ या मालिकेत त्यांनी दिवंगत वकील राम जेठमलानी यांची भूमिका त्यांनी साकारली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *