बॉलिवूड पुन्हा हादरले! ‘सनम बेवफा’ फेम आणि प्रसिध्द दिग्दर्शकाचे निधन; देशावर शोककळा

मुंबई | हिंदी सिनेसृष्टीला एका पाठोपाठ एक असे धक्के बसत आहेत. प्रसिद्घ दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांनी गुरुवारी २५ ऑगस्टला दुपारी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या निधनाने कलाविश्वाचे‌ मोठे नुकसान झाले आहे.

सावन कुमार टाक यांचा पुतण्या आणि चित्रपट निर्माता नवीन कुमार टाक याने यांनी ही माहिती दिली . सावन कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता . त्यापूर्वी त्यांना फुफ्फुसाचाही आजार होता . गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली होती . यासाठीच त्यांना धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं . गुरुवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती बिघडली होती . अखेर सावन कुमार हे या आजारातून बाहेर आले नाहीत .

सावन कुमार यांच्या निधनाची बातमी देताना त्यांचे पुतणे नवीन कुमार म्हणाले की, “डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका आणि त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. नवीन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सावन कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे फुफ्फुस पूर्णत: निकामी झाल्याचे आढळून आले. आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या सावन कुमार यांचे हृदय देखील नीट काम करत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार यांना सावन कुमार यांनीच सिनेमात पहिला ब्रेक दिला होता . तब्बल चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संजीव कुमार ते सलमान खान यांसारख्या स्टार्ससोबत काम केले होते. सावन कुमार टाक यांनी निर्माता म्हणून ‘ नैनिहाल’ हा पहिला चित्रपट बनवला, ज्यामध्ये संजीव कुमार यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. सावन यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबत दिग्दर्शक म्हणून ‘गोमती के किनारे’ हा पहिला चित्रपट बनवलेला, जो १९७२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

सावन कुमार टाक यांनी संजीव कुमार, मीना कुमारी व्यतिरिक्त राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान अशा सर्व बड्या स्टार्ससोबत काम करून हिट चित्रपट दिले होते. सावन कुमार यांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या प्रवासातील सावन द लव्ह सीझन हा शेवटचा सिनेमा सलमान खान याच्यासोबत केला . त्यानंतर मात्र त्यांनी सिनेमा क्षेत्रातून निवृत्ती घेतली . सध्या ते मुंबईतील आपल्या घरीच होते . परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत बिघाड सुरू झाला होता .

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *