बॉलिवूड पुन्हा हादरलं! आणखी एका दिग्गजाचे निधन; चित्रपट सृष्टीवर शोककळा

मुंबई | मनोरंजन विश्वात कलाकारांच्या निधनाच्या बातम्यांचा नुसता पूर आला आहे. अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून दूर निघून चालले आहेत. यावर्षी बॉलीवुड, हॉलीवुड आणि टॉलीवुड मधील अनेक कलाकार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले आहेत. आता यामध्ये बॉलीवूडमधील एका दिग्गज निर्मात्याचे नाव देखील सामील झाले आहे.
या निर्मात्यांनी बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक व्यक्ती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. मनोरंजन विश्वातून त्या निर्मात्याचे जाणे अनेकांच्या मनाला चटका लावणारे आहे. नुकतेच निधन झालेल्या प्रसिद्ध निर्मात्यांचे नाव अब्दुल गफ्फार नाडियादवाला असे आहे. अब्दुल यांनी त्यांच्या कारकीर्दीत भन्नाट कॉमेडी असलेले अतरंगी चित्रपट प्रेक्षकांना दाखवले.

 

चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा होता. ते ज्या चित्रपटाची निर्मिती करायचे त्यामध्ये नेहमीच कॉमेडीचा तडका लागलेला असायचा. साल १९६५ मध्ये आलेले महाभारत बऱ्याच व्यक्तींनी पाहिले असेल. दारासिंग आणि प्रदीप कुमार या दोन अभिनेत्यांनी या मालिकेमध्ये अभिनय केला होता. याची निर्मिती अब्दुल यांनीच केली होती.

 

साल 2000 मध्ये आलेला चित्रपट हेराफेरी. या चित्रपटाने तर प्रेक्षकांना हसवून हसवून वेडे केले होते. आजही अनेक व्यक्ती हा चित्रपट पाहणे पसंत करतात. बॉलीवूड मधील सदाबहार चित्रपटांमध्ये हेराफेरी हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर येतो. अब्दुल यांची निर्मिती असलेला वेलकम हा चित्रपट देखील प्रचंड गाजला. यामध्ये नाना पाटेकर यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

अब्दुल गफार नाडियादवाला यांचे वडील ए के नाडियादवाला यांची नाडियादवाला फिल्म कंपनी होती. अब्दुल देखील या कंपनीचा एक भाग होते. निर्मिती क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी एजी फिल्म आणि पुष्पा पिक्चर्स यांसारख्या मोठ्या बॅनरची निर्मिती केली. साल १९५३ मध्ये त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. मनोरंजनाच्या कारकिर्दीत पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. आ गले लग जा, लहू के दो रंग, झूठा सच, शंकर शंभू, रखवाले, वतन, सोने पे सुहागा असे भन्नाट चित्रपट त्यांनी या बॉलीवूडला दिल्या आहेत.

या प्रसिद्ध आणि दिग्गज निर्मात्याचे 22 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सुरुवातीला घरामध्ये त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथे डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्तीचे उपचार केले. मात्र यामध्ये सर्व काही अपयशी ठरले. त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध निर्माता फिरोज याने आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती माध्यमांवर दिली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *