बॉलीवुड हादरलं! राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आणखी एका विनोदी अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

मनोरंजन | टीव्ही इंडस्ट्रीसाठी आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे दिग्गज कॉमेडियनराजू श्रीवास्तवयानंतर आणखी एका कॉमेडियनने जगाचा निरोप घेतला आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनमधील स्पर्धक पराग कंसारा यांचं निधन झाले आहे. त्याचा मित्र आणि प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली.

पराग कंसारा हे गुजरातच्या वडोदरा शहरात राहणारे होते. पराग कंसारा हे अतिशय जबरदस्त असे विनोदी होते. लाफ्टर चॅलेंज याच्या पहिल्या शोमध्ये ते दिसले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रापासून दूर गेले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळतेय. लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सेशनमध्ये ते आपल्याला दिसले होते. मात्र, त्यांना या शोचा किताब मिळू शकला नव्हता, असे असले तरी त्यांनी सगळ्यांचे खूप मनोरंजन केले होते. त्यानंतर सगळ्यांनी त्यांना डोक्यावर घेतले होते.

लाफ्टर चॅलेंज सिजनमध्ये होते स्पर्धक – पराग कंसारा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचा स्पर्धक होता. तो विजेता होऊ शकला नसला तरी त्याची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या शिवाय तो इतर कॉमेडी शो (कॉमेडी का किंग कौन) मध्येही दिसला आहे. मात्र, पराग गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कॉमेडी शोमध्ये दिसला नाही. 2011 मध्ये परागला वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षाही झाली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *