बॉलीवुड हादरलं! अभिनेत्री दिया मिर्झाच्या मुलीचे निधन; बॉलीवुडवर शोककळा

मुंबई | बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. एकीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातम्या समोर येत होत्या तर बॉलीवुडमध्ये प्रेग्नेंसीच्या चर्चेने आनंदाचे वारे वाहत होते. मात्र या आनंदाला आता विरझन लागलं आहे. बॉलीवुडच्या एका अभिनेत्रीच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एका खूप जवळच्या तरुण मुलीला गमावलं आहे. अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या भाचीचे निधन झाले आहे. तिची भाची एका अपघातामध्ये वारली. त्यामुळे अभिनेत्री खूप दुखी आहे. ती आपल्या भचीचे खूप लाड करायची. आता ती या जगात नसल्याने दिया खूप दुःखी आहे. आपले दुःख तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केले आहे.

अभिनेत्रीने आपल्या भाचीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात तिने लिहिले आहे की, ” माझी भाची. माझी लहान मुलगी माझे प्रेम. तिने हे जग सोडले. माझी प्रिय, तू कुठेही असशील, तिथे तुला शांती आणि प्रेम मिळो… तू आमच्या हृदयात नेहमी स्मितहास्य आणलेस आणि तू कुठेही असशील, तिथे तुझ्या नृत्याने, हसण्याने आणि गाण्याने उजळून निघेल. ओम शांती.” असे म्हणत तिने दुःख व्यक्त केले आहे.

अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून सुरुवातीस अनेकांना वाटले की, तिच्या मुलीचेच निधन झाले आहे. मात्र तिच्या मुलीला काही झाले नसून तिच्या भाचिचे निधन झाले आहे. दियाची भाची तान्या काकडे काँग्रेसचे नेते फिरोज खान यांची मुलगी आहे. एका कार अपघातात तिचा नृत्य झाला. तिचे असे अचानक निधन झाल्याने दिया खूप खचली आहे. कारण ती आपल्या भाचीला आपल्या मुली प्रमाणे सांभाळत होती.

दियच्या या पोस्टवर बोमन इराणी यांनी लिहिले की, ‘हे हृदय तोडणारे आहे. तुमचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आशा आहे की ती ठीक असेल. मी प्रार्थना करतो.” त्याचवेळी अर्जुन रामपालनेही आपले दुःख व्यक्त केले आणि लिहिले की, ‘दिया हे ऐकून दुःखी झाले. त्यांच्या आत्म्याला आणि तुमच्या परिवाराला शोक आणि प्रार्थना. ओम शांती.”

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *