बॉलिवूड हादरलं! गदर चित्रपटातील दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर अनेक दिग्दर्शक त्या चित्रपटाचा सिक्वल चाहत्यांच्या भेटीला आणतात. अशात आता “गदर एक प्रेम कथा” या चित्रपटाचा सिक्वल देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे चाहते खूप आनंदी आहेत. गदर हा चित्रपट १५ जून २००१ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाने त्यावेळी सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. हा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्याच दिवशी आमिरचा “लगान” हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी चढाओढ दिसली. मात्र शेवटी दोन्हीही चित्रपटांची समान कमाई झाली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिस प्रचंड गाजले. १.३३ बिलियनची कमाई गदरने केली होती.

या चित्रपटाने तर प्रेक्षकांना वेड लावले होते. दोन प्रांत आणि त्यात अडकलेले दोन जीव. तसेच त्यांची एकमेकांसाठी सुरू असलेली घालमेल यात दाखवली गेली. अभिनेता सनी देओलने यात मुख्य भूमिका केली होती. यात त्याने तारा सिंग हे पात्र साकारले होते. तर अमिषा पटेलने यात सकिना हे पात्र साकारले होते.

या दोन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला पूर्ण न्याय दिला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी चंगळ केली. भारत आणि पाकिस्तान हा वाद त्याकाळी खूप सुरू होता. अनेक दंगली त्यावेळी होत होत्या. हेच वास्तव चित्रपटात मांडले गेले. मात्र यात प्रेमाची पालवी फुटलेली दाखवली.

दंगल सुरू असताना सकीना ताराला भेटते. ती आधी त्याच्या कॉलेजमध्ये त्याला भेटलेली असते. त्यामुळे आपल्या मॅडमजीवर तो तलवार न चालवता तिचे रक्षण करतो. तिला जीवनदान देतो. मात्र लग्न करून सुखी संसार सुरू असताना ती तिच्या घरी कुटुंबीयांना भेटायला जाते आणि मग या दोघांची ताटातूट होते. हा चित्रपट अगदी अंगावर शहारे आणणारा ठरला.

“मुसाफिर जाणे वाले नही फिर अने वाले….” अशा गाण्यांनी या चित्रपटाला चार चाँद लावले. अनिल शर्मा यांनी याचे दिग्दर्शन केले होते. नुकतेच त्यांनी या चित्रपटाच्या सिक्वलची देखील घोषणा केली. मात्र आता त्यांच्यावर दुःखाचे सावट आले आहे. त्यांचे वडील केसी शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हृदय विकाराचा झटका येऊन केसी शर्मा यांचे निधन झाले आहे. यामुळे अनिल यांच्या दुःखाला पारावार उरलेला नाही. अनेक चाहते त्यांच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना धीर देत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *