शोलेमधल्या सांभाच्या मुलीला पाहिलं का? सोशल मीडियावर हॉटनेसचा नुसता केलाय कहर…

मुंबई |  कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्यातील कलाकारांचा अभिनय दमदार असणे खूप गरजेचे असते. एक कलाकार जितक्या चांगल्या पद्धतीने अभिनय करेल तितकाच तो चित्रपट हिट ठरत असतो. तर अशा कलाकारांमुळे काही चित्रपट इतके हिट होतात की, वर्षानुवर्षे त्या चित्रपटांचा दबदबा कायम राहतो. अशाच काही हिट चित्रपटांपैकी एक १९७६ मध्ये प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट. या चित्रपटाने त्या काळात तिकीट बारिवर चांगलीच कमाई केली. चित्रपटाची कहाणी आणि त्यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

या चित्रपटात गब्बर, ठाकूर, जय, विरू, बसंती ही मुख्य पात्रे होती. मात्र चित्रपट हिट होण्यामागे फक्त याच पात्रांचा समावेश नाही. चित्रपटात असलेले साईट ॲक्टर देखील वेगळ्या धाटणीचे होते. अशात यामध्ये गब्बर आणि त्याच्याकडे कामाला आलेल्यांपैकी एक म्हणजे कालिया आणि सांभा ही दोन्ही पात्रे एवढी मजेशीर आणि मनोरंजक आहेत की, या दोघांशिवाय हा चित्रपट अपूर्णच आहे. चित्रपटात सांभा हे पात्र अभिनेते मॅक मोहन यांनी साकारले होते.

या चित्रपटात गब्बरच्या तोंडून सांभा हे नाव सतत ऐकू येत होत. यामध्ये मॅक यांना तसे फारसे डायलॉग नव्हते मात्र तरी देखील हे पात्र चित्रपटाच्या महत्वपूर्ण पात्रांपैकी एक होतं. अशात सांभा म्हणजेच मॅक मोहन यांच्या वयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी तुम्हाला माहीतच असतील. तर आज मॅक यांच्या विषयी नाही तर त्यांच्या सुंदर मुलींविषयी जाणून घेणार आहोत.

मॅक यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव मंजिरी आहे तर छोट्या मुलीचे नाव विनती आहे. मंजिरी सोशल मीडियावर तशी फार सक्रिय नसते आणि लाईमलाईट पासून देखील दूर असते. मात्र विनती ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिवाय ती एक अभिनेत्री देखील आहे तसेच निर्मितीचे काम देखील ती करते. सोशल मीडियावर तिचे भरपूर चाहते आहेत.

विनती सोशल मीडियावर नेहमीच आपले सुंदर आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. तिचा अभिनय देखील खूप छान आहे. शिवाय ती तिच्या सौंदर्याने सतत छत्यांच्या मनात घर करत असते. तिचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर लक्षात येईल की ती सोशल मीडियावर किती सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर आणि गोड दिसते आहे. शिवाय तिने यामध्ये वेगवेगळ्या पोज देत हे शूट केलं आहे.

https://www.instagram.com/p/Cf14mHGoGqd/?utm_source=ig_web_copy_link

विनती कधी निसर्गाच्या सानिध्यात तर कधी झगमगत्या लायटिंगमध्ये फोटो काढताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहते नुसता लाइक्स आणि हार्ट इमोजिचा वर्षाव करत आहेत. तसेच तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट देखील येत आहेत. एका युजरने तिच्या या फोटोंवर लिहिले आहे की, ” खूप सुंदर तू तर बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींना देखील मागे टाकशील.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, ” वाह! तुझी प्रत्येक पोज अनोखी आहे.” चाहत्यांच्या या कमेंट विनतीसाठी खूप मोठ्या आहेत. तसेच लवकरच ती बॉलिवूडवर राज्य करेल असं देखील काही जण म्हणत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *