बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा झाला असा अपघात की, चेहऱ्यातून काढाव्या लागल्या ६७ काचा….

 

मुंबई | दील है तुम्हारा, दील क्या करे अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय साकारणारी अभिनेत्री महिमा चौधरी ही आता सिनेसृष्टीपासून थोडी दूर आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांमुळे तिला अभिनयापासून कायमचे मुकावे लागले आहे. तिच्या आयुष्यात एक भयानक प्रसंग घडला त्यामुळे तिच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. काय होता तो प्रसंग हेच या बतमीतून जाणून घेऊ.

 

अभिनेत्री महिमा चौधरीने नव्वदच्या दशकात खूप चित्रपट केले. नुकताच अनुपम खेर यांनी तिच्या बरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तिला एक गंभीर आजार झाल्याचे समजले.

 

व्हिडिओमध्ये दोघे बातचीत करताना दिसत आहेत. तसेच महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं यामध्ये समजलं. आता ती या आजाराशी झुंज देत आहे. अनेक उपचार सुरू आहेत. तसेच ती तब्येतीची अधिक काळजी घेत आहे. या मध्ये अनुपम खेर यांनी महिमला एक सुपर हिरो असं संबोधलं आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर पेक्षा अधिक भयावह परिस्थितीवर तिने काही काळा पूर्वी मात केली आहे.

 

अभिनेत्री दील क्या करे या चित्रपटाच्या शुटींगसाठी बंगळुरू येथे गेली होती. त्यावेळी तिथे तिच्या गाडीचा एक भीषण अपघात झाला होता. तिची चार चकी गाडी समोरील एका ट्रकला धडकली होती. त्यामुळे तीच्या गाडीचा पूर्ण चेंदा झाला. अशात तिला देखील खूप जखमा झाल्या. अपघात एवढा भीषण होता की, तूच्या चेहऱ्याला जबर मार लागला होता आणि ती रक्तबंबाळ झाली होती.

 

त्यावेळी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या चेहाऱ्यातून १० १२ नाही तर तब्बल ६७ काचा काढल्या होत्या. त्यामुळे तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर टाके घातले गेले होते. या परिस्थितीत कित्येक दिवस तिला सूर्यप्रकाशापासून देखील दूर ठेवण्यात आले होते. तसेच तिच्या खोलीत देखील नेहमी अंधार ठेवला जात होता.

 

ज्यावेळी तिने तिचा चेहरा आरशात पहिला होता त्यावेळी ती खूप घाबरली. स्वतः ला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. मात्र ती यातून मोठ्या हिमतीने सावरली. या काळात काम करण्याची इच्छा असून आणि हातात चित्रपट असून देखील तिला अभिनय करता आला नाही. याच प्रसंगाने तिला अभिनयापासून दूर केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *