राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाचा मोठा खुलासा; ६० तासापासून देत आहेत मृत्यूशी झुंज

दिल्ली | राजू श्रीवास्तव यांना काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशात आता ते मृत्यूशी झुंज देत असताना त्यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली.

काही व्यक्तींनी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त फिरवले. यामुळे सगळे जण भयभीत झाले. तसेच अनेकांना रडू कोसळले. मात्र यावर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या फक्त एक अफवा असल्याचे म्हटले आहे. राजू त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.

काही वेळ राजू यांचा बीपी नॉर्मल झाला होता. त्यांनी पायांची देखील हालचाल केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचा बीपी कमी जास्त होतं आहे. त्यामुळे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीपी बरोबरच राजू यांच्या मेंदू कडे देखील अधिक लक्ष द्यावे लागत आहे. कारण आता ४३ तासांहून अधिक वेळ झाला आहे. मात्र ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या मेंदू पर्यंत सूचना पोहचणे आणि त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी क्रिटिकल केअर, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोलॉजी आणि न्यूरोलॉजी असे सर्व डॉक्टर तिथे उपस्थित आहेत.

एकीकडे कुटुंबीय त्यांच्या तब्येतीचे चिंतेत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय नाराज आहेत. राजू यांना जिममध्ये वर्कआऊट करत असताना हृदय विकाराचा झटका आला. ज्यात ते ट्रेडमिलवरून खाली पडले. आता डॉ.अनन्या गुप्ता यांनी दिलेल्या माहितनुसार राजू यांच्यावर अँजिओप्लास्टी केली आहे. हळूहळू ते ठीक होत आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य वॉर्डमध्ये नेले जाणार आहे. या शस्त्रक्रिये नंतर त्यांचा भीती 80 ते 56 एवढा आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले गेले आहे. त्यांच्याविषयी सुरू असलेल्या निधनाच्या अफवा पसरवू नये अशी त्यांचे कुटुंबीय विनंती करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *