राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती विषयी मोठी माहिती; MRI रिपोर्ट मध्ये मोठा खुलासा

नवी दिल्ली | प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या तब्येती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यांच्या मेंदूमध्ये बिघाड झाल्याचे समजले आहे. त्यामुळे ते अजूनही ठीक झालेले नाहीत. त्यांना ठीक होण्यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

१३ ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय केला गेला. यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये बिघाड असल्याचे समजले. त्यामुळेच राजू कोणताही प्रतिसाद देत नाहीत. याची माहिती त्यांचे भाऊ दिपू यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ” राजू यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांची एक संपूर्ण टीम उपचार करत आहे. त्यांच्या मेंदू पर्यंत काहीच पोहचत नसल्याने आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा MRI केला आहे. यात असे समजले आहे की, त्यांच्या मेंदूच्या नसा दबल्या गेल्यात.”

पुढे त्यांनी सांगितले की, ” मेंदूच्या नसा दबल्याने राजू यांना ठीक होण्यासाठी आणखीन १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. राजू यांना वाचवण्याचे सगळेच डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजू श्रीवास्तव यांच्या हृदयामध्ये आधी ब्लॉकेज होते. त्यामुळे त्यांची एक शस्त्रक्रिया केली गेली. यातून त्यांनी ३ दिवसांनी पायाच्या बोटांची हालचाल केली होती. मात्र नंतर काहीच बदल होतं नव्हता. त्यामुळे त्यांचा MRI करण्यात आला. आता डॉक्टर पुढील उपचार करत आहेत.

राजू यांचे भाऊ काजू हे देखील याच एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कानाला गाठ आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात काजू यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना त्यांचे भाऊ राजू यांच्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

अशात सोशल मीडियावर सतत राजू श्रीवास्तव यांच्या विषयी वाईट आणि निधनाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, ” आम्ही सर्व जण राजू यांच्या विषयी चिंतेत आहोत. तुम्ही कृपया त्यांच्या निधनाची अफवा पसरवू नका. राजू यांचा जीव वाचावा म्हणून डॉकटर देखील मेहनत घेत आहेत. तुम्हाला राजू यांची जी काळजी वाटत आहे तशीच आम्हला देखील वाटत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो.” असे त्यांनी यात लिहिले होते.

राजू यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या पत्नीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन केला होता. त्यांनी राजू यांच्या पत्नीशी बातचीत करत त्यांना मदत केली जाईल असे देखील म्हटले आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांच्या कुटुबीयांकडून राजू यांच्या तब्येतीची माहिती घेतली आहे. या सर्वच राजकीय व्यक्तींनी राजू यांच्या कुटुंबीयांना धीर देत त्यांना मदतीचे आश्वासन केले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *