Big boss 4 | पुन्हा एकदा महेश मांजरेकर करणार शो होस्ट; मोठी घोषणा

मुंबई | बिग बॉस मराठी या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे. आतापर्यंत या शोचे यशस्वीरित्या तीन पर्व पूर्ण झाले आहेत. लवकरच याचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये सूत्रसंचालन नेमकं कोण करणार या वरती चर्चा रंगली होती. गेल्या अनेक दिवसांपासून महेश मांजरेकर हे बिग बॉस मध्ये नसणार अशी बातमी समोर येत होती.

यावेळी महेश मांजरेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, “बिग बॉस बरोबर माझे तीन सीझनसाठीचे कॉन्ट्रॅक्ट झाले होते. माझे हे कॉन्ट्रॅक्ट संपले आहे. ” महेश मांजरेकर यांचे कॉन्ट्रॅक्ट संपले असल्याने आता चौथ्या पर्वात नेमकं कोण सूत्रसंचालन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी अनेक चाहत्यांनी पुन्हा एकदा महेश मांजरेकरच होस्ट म्हणून पाहिजेत अशी मागणी केली.

याच दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे देखील नाव खूप चर्चेत होते. अभिनेता सिद्धार्थ जाधव याने महेश मांजरेकर यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी सिने विश्वातील सध्याच्या घडीचा तो आघाडीचा अभिनेता आहे. महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ या दोघांचा दे धक्का २ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. यादरम्यान सिद्धार्थ जाधव हा बिग बॉसच्या घरामध्ये महेश मांजरेकर यांची जागा घेणार तसेच या कार्यक्रमांमध्ये आता तो होस्ट असणार अशी चर्चा रंगली होती.

मात्र यावेळी सिद्धार्थने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. सर्वच जण त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. त्याचबरोबर अनेकांना बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे वेध लागले होते. अशात आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये होस्ट म्हणून नेमकं कोण झळकणार याची घोषणा झालेली आहे. या शो मध्ये अभिनेते महेश मांजरेकर हेच आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.

नुकताच या शोचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये महेश मांजरेकर बिग बॉसच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांचा डॅशिंग अंदाज सर्वांना आवडला आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की,” नवीन घर नवीन स्पर्धक मात्र शिक्षक तोच… शाळा नवीन असते आणि मुलं ही नवीन असतात मात्र शिक्षक कधीच बदलत नाही…” असे महेश मांजरेकर या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. महेश मांजरेकर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याने चाहते फार खुश आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *